Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» St Bus- Truck Accident At Nifad, Nashik

नाशिक: निफाडजवळ एसटी बस व ट्रकची धडक, नऊ प्रवासी जखमी

दिव्यमराठी वेब टीम | Sep 13, 2017, 17:01 PM IST

  • ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी बस ट्रकला अशी धडकली.
निफाड- निफाड जवळील वसल्य लोंन्स जवळ सकाळी नऊ वाजता बस व ट्रक यांच्यात अपघात होऊन बस मधील नऊ प्रवासी जखमी झाले. जखमींवर निफाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
निफाड जवळील वसल्य लोन्सजवळ माल ट्रक क्र डब्लू बी १२८६ हा राज्य महामार्गावरून जात असताना येवला आगाराची बस क्र एम एच ४० ८९९४ ही बस ओव्हरटेक करत असताना ट्रकवर जाऊन आदळली. त्यात बसचा पुढील भाग चकाचुर झाला असून चालक वाहक यांच्यासह ९ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघातात प्रवाशी पुंजाराम निवृत्ती गायकवाड (वय ६५ रा सोनेवाडी), सतीश भाकरचद गंभीरे (वय २३ धारणगाव वीर), भगवान दगडू शिंदे (वय ५७ कुरुडगाव) विजय सोपान वाघ (वय ३१ वाहक, राजापूर) वैशाली निलेश मोरे (वय ३६ निफाड), जीवन गायकवाड (वय ४२ अंदरसूल), सुरेश दादा विंचू (वय ४५ चालक राजापूर), कैलास नामदेव तांदळे (वय- ३१ निफाड), अमोल काशिनाथ बोरगुडे (वय- २० नैताळे) हे जखमी झाले आहेत. जखमीवर डॉ. रोहन मोरे, डॉ. सौरव ढेपले, डॉ. संकेत आहेर आदींनी तातडीने उपचार केले.

Next Article

Recommended