आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षक जाळ्या बसविणे एसटी बसेसला खर्चिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- फेसबुकवरील महापुरुषांच्या आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ झालेल्या दगडफेकीत एकाच दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या सात बसेसना लक्ष केले गेले. त्यामुळे महामंडळाला मोठा फटका बसला. मात्र, नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व महामंडळाच्या फायद्यासाठी संरक्षित जाळ्या खर्चिक असल्याने महामंडळाला त्या परवडत नसल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
कोणतीही दंगल अथवा मोर्चे, निदर्शने आंदोलन यांना हिंसक वळण लागल्यास सर्वप्रथम लक्ष्य केले जाते ते एसटी बसेसना. रविवारी अशाच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. फेसबुकवर महापुरुषांची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर ठिकठिकाणी त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या वेळी झालेल्या दगडफेकीत नाशिक विभाग बस डेपोच्या सात बसेसना लक्ष्य केले गेले होते. त्यात जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाले.
नाशिक शहर व मालेगाव या दोन ठिकाणी हे प्रकार घडले. नव्या नियमानुसार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दंगलीत सहभाग असल्यास त्या पक्षावर झालेल्या नुकसानाची जबाबदारी निश्चित केली जाते. किमानपक्षी नुकसानभरपाई मिळण्याची आशा असते. परंतु, रविवारी घडलेल्या प्रकारात अज्ञात लोक असल्याने त्याची झळ एसटी महामंडळाला सोसावी लागली.