आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस तिकीट आरक्षणाचे एसएमएस मिळताहेत मोबाइलवर, पेपरलेस कामाकडे एसटीची वाटचाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- विविध विभागांची पेपरलेस कामाकडे वाटचाल सुरू असताना, एसटीनेही त्यावर पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. बस तिकीट आरक्षणाचा एसएमएस मोबाइलवर पाठवण्यात येत असून, प्रवास करताना तो ग्राह्य धरला जात आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना येणाऱ्या अडचणीतूनही सुटका होण्यास मदत झाली आहे.
इ-तिकीट आरक्षित केल्यानंतर महामंडळाचा एसएमएस मोबाइलवर प्राप्त होणार आहे. प्रवासाअगोदर प्राप्त झालेल्या एसएमएसच्या आधारे प्रवास करणे शक्य झाले आहे. वाहकास एसएमएस, ओळखपत्र दाखवून प्रवास करता येईल. यापूर्वी इ-तिकिटाची प्रिंट वाहकास दाखवून प्रवास करता येत होता. इंटरनेट सेवेत अडचण आल्यास प्रवाशांची अडचण होत होती. स्मार्टफोनवर इ-तिकीट दाखवूनही प्रवास करता येत होता. परंतु, साध्या मोबाइलधारक प्रवाशाची अडचण विचारात घेऊन एसएमएस ग्राह्य धरण्याचे आदेश आगारांना प्राप्त झाले आहेत.
प्रवाशांचे फायदे : तिकीटसांभाळण्याची गरज आता राहिली नाही.त्यामुळे तिकीट गहाळ होण्याचा प्रश्नही उद‌्भवणार नाही. एसएमएस सेवा ग्राह्य धरली जाणार असल्याने प्रवासी वाहकात इ-तिकीट दाखवण्यावरून उडणारे खटके आता थांबणार आहेत. आरक्षणाची माहिती तत्काळ उपलब्ध होते.
तक्रारींपासून सुटका
तिकीटहरवले आहे, लॅपटॉपमध्ये तिकीट आहे. ते ग्राह्य धरा, असे अनेक समस्यांमुळे वाहक प्रवाशांत खटके उडत होते. आता तसे होणार नाही. तक्रारींपासून प्रवाशाची सुटका झाली आहे. यामिनीजोशी, विभागीयवाहक नियंत्रक, नाशिक

‘पर्यावरण वाचवा’चा संदेश
तिकिटासाठीकागदाचा वापर होत असल्याने तो टाळून पेपरलेस कामाला महत्त्व देण्यात आले आहे. कागद निर्मितीसाठी जंगलांची तोड होत असल्याने पर्यावरणासाठी ते घातक असून, कागदाचा वापर कमी व्हावा, हाही उद्देश राज्य परिवहन मंडळाने ठेवला आहे.
संदेश प्रणालीचे कार्य
इ-तिकिटाचेआरक्षण करताच अवघ्या काही सेकंदांत भ्रमणध्वनीवर एसएमएस येतो. DM-e MSRTC या अक्षराने सुरुवात झालेल्या लघुसंदेशावर आसन क्रमांकासह सर्व माहिती तत्काळ मिळते. त्यामुळे आरक्षण झाल्याची खात्री लगेचच होते. हा लघुसंदेश प्रवासाच्या अखेरपर्यंत जपून ठेवणे गरजेचे असते.
असा आहे एसएमएस
तिकीटक्रमांक, प्रवाशाचे नाव, प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण अखेरचे स्थानक, प्रवासाची तारीख, सेवेचा प्रकार वेळ, सीट क्रमांक, भाडे, एकत्रित आरक्षण केल्यास एकूण प्रवासी, अर्धे तिकीट पूर्ण तिकीट असलेले प्रवासी असा उल्लेख असेल. आरक्षित तक्ता वाहकाकडे असल्याने बनावट एसएमएस ओळखणेही वाहकास सहज सोपे होणार आहे. एसएमएसवर प्रवास करणाऱ्या प्रवासाची नोंदही इव्हीएम मशीनमध्ये घेतली जाणार आहे.