आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीला अवघे सव्वातीन काेटी उत्पन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकुंभमेळ्यात महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने ५०० काेटींचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले हाेते. मात्र, गृहित धरलेल्या भाविकांच्या संख्येनेनुसार पन्नास टक्केही भाविक पर्वणीला अाले नसल्याने एसटी प्रशासनाला अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. सर्व पर्वण्यांच्या उत्पन्नाची गाेळाबेरीज केली, तर जिल्ह्यातील बसच्या माध्यमातून महामंडळाला केवळ काेटी २४ लाख रुपयांपर्यंतच मजल मारता अाली अाहे. वाहनतळ उभारणीचा अाणि इंधन खर्चाचा विचार केला, तर एसटी सपशेल ताेट्यात गेल्याचे दिसून येत अाहे.

जिल्हा प्रशासनाने पर्वणी काळात तीन ते चार काेटी भाविक येण्याचा अंदाज वर्तविला हाेता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने तीन हजार बसचे नियाेजन करून तात्पुरत्या स्वरूपातील २१ वाहनतळांची निर्मिती केली हाेती. या वाहनतळांची निर्मिती करण्यासाठी, सीसीटीव्ही अाणि शहरातील बसस्थानकांच्या डागडुजीसाठी काेट्यवधी रुपये खर्च केले हाेते. मात्र, तिन्ही पर्वण्यांमिळून ११ लाख ४५ हजार भाविकांनीच एसटीने प्रवास केल्याने केवळ काेटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले अाहे.
पहिल्या पर्वणीत पाेलिसांनी अतिरेकी बॅरिकेड्स लावल्याने भाविकांत नकारात्मक संदेश गेल्याने पहिल्या पर्वणीकडे भाविकांनी सपशेल पाठ फिरवली हाेती. त्यामुळे पहिल्या पर्वणीच्या दिवशी तीन हजार बसपैकी केवळ ११०० बस धावल्या हाेत्या. त्यानंतर वाहतुकीचे फेरनियाेजन झाले खरे, मात्र महामंडळाला अपेक्षित प्रवाशांची करता अाल्याने वाहतूक नफा मिळवणे तर दूरच राहिले, झालेला खर्चदेखील काढणे महामंडळास कठीण झाले अाहे.

सीसीटीव्ही राहणार कायमस्वरूपी
पर्वणी काळात भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामंडळाने ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी केली हाेती. बसस्थानकांवर हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात अाले हाेते. हे सीसीटीव्ही कॅमेरे अाता कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला अाहे. त्यामुळे शहरातील बसस्थानके अाता कायमस्वरूपी कॅमेऱ्याच्या निगराणीखाली राहणार अाहेत.