आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीचे नियोजन; बसच्या पाससाठी विद्यालयातच केंद्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहर व परिसरातील शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) मासिक सवलतीचे पासेस वितरीत केले जाते. यंदाच्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दीड हजारापेक्षा जादा पासधारक असणार्‍या शाळा-महाविद्यालयाच्या आवारात पास वितरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाकडून शाळा-महाविद्यालयांची माहिती घेऊन नियोजन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एसटीतर्फे विद्यार्थ्यांना मासिक सवलतीचे पास देण्यात येतात. महामंडळाकडून दीड ते दोन हजार पासेसची संख्या असणार्‍या शाळा-महाविद्यालयात यासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

सद्यस्थितीत पासेस केंद्र : भुजबळ नॉलेज सिटी, के.के.वाघ महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालय, सिडकोतील त्रिमुर्ती चौक, सातपूर बसस्थानक, शिवाजीनगर, मध्यवर्ती बसस्थानक, मेळा बसस्थानक, नाशिकरोड आणि निमाणी बसस्थानक

याठिकाणी प्रस्तावित : एचपीटी महाविद्यालय, इंदिरानगर(गुरू गोविंदसिंग महाविद्यालय), रविवार कारंजा(पेठे विद्यालय), जेलरोड, संदीप फांउडेशन, सिडकोतील लेखानगर, पाथर्डी फाटा भागातील शाळा-महाविद्यालये.

नवीन कर्मचार्‍यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा
भरती प्रक्रियेत सुमारे 200 नवीन लिपिक नियुक्तीची प्रतीक्षा असून ते नियुक्त होताच विद्यार्थी, शाळा, महाविद्यालयांच्या मागणीनुसार पासेस वितरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. साधारणत: दीड ते दोन हजार विद्यार्थी पासेस असलेल्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल, यासाठीचे नियोजन सुरू आहे. कैलास देशमुख, विभागीय नियंत्रक