आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीला टोल माफीसह इंधन कर रद्द करावा एसटी कामगार संघटनेची मागणी ,

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक
नाशिक - शासन पातळीवर झालेल्या बैठकीत प्रवासी कराचा दर १० टक्के करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक असून एसटीला टोल माफीसह इंधनावरील व्हॅट दरात महामंडळाला सूट मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हुनमंत ताटे व अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी कामगार मेळाव्यात केली.

कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने प्रवासी दर १७.५ टक्क्यांवरून १० टक्के केला पण त्याच्या अंमलबजावणीस दिरंगाई होत आहे. एसटी बसेसला टोल माफ करण्यासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्वच मार्गावर टोल माफ होणे आवश्यक आहे. विविध घटकांना दिल्या जाणा-या सवलत मूल्यांची प्रतिपूर्ती महामंडळास आगाऊ मिळावी. सर्व निर्णयांची अंमलबजावणी झाल्यास एसटीच्या आर्थिक स्थितीत अनुकूल बदल होऊ शकतो,असेही ताटे यांनी या वेळी सांगितले.

हे मुद्दे ठरले चर्चेचे
पोलिस कर्मचा-यांच्या मुलांप्रमाणे सरळ भरतीमध्ये ५ टक्के जागा राखीव असाव्यात, चालक वाहक कार्यशाळा कामगार अपघातात जखमी, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र अवलंबितास नोकरी देण्यात यावी, कँशलेस योजना लागू करावी, सेवानिवृत्त कर्मचारी व पत्नीस ५०० रुपये वार्षिक भरून मोफत पास द्यावा, वेतन करारातील त्रुटी विसंगती दूर कराव्यात, करार, कायदे, परिपत्रक यांचा भंग करून घेतलेले निर्णय रद्द करावे, चालक वाहक वेळापत्रकातील त्रुटी दूर करून धाववेळ देण्यात यावी. नवीन गाड्या व मनुष्यबळ देण्यात यावे.