आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचार्‍यांना मिळणार 13 टक्के वेतनवाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची शुक्रवारी सह्याद्री अतिथिगृहामध्ये एसटी कामगारांच्या प्रश्नांवर तासभर चर्चा झाली. या वेळी मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे हनुमंत उपरे उपस्थित होते. बैठकीत कामगारांना 13 टक्के वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे 23 एप्रिलपासून एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप टळला आहे.

कामगार संघटनेचे विभागीय सचिव प्रमोद भालेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही माहिती दिली. गेल्या चार महिन्यांपासून हा वेतनवाढीचा करार रखडला होता. संघटना आणि महामंडळ यांच्यात एकमत होत नसल्याने कर्मचार्‍यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, संपावर असलेल्या प्राध्यापकांबद्दलही बैठकीत चर्चा झाली.