आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ST Thakere Development Funds Assistance Accident

एसटीची ठाकरे अपघात सहाय्यता निधीत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळातर्फे एसटी अपघातात मृत अथवा अपंगत्व आलेल्या प्रवाशांना, तसेच अन्य अपघातग्रस्त घटकांना नुकसानभरपाई देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधीअंतर्गत अपघातग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची रक्कम काहीअंशी वाढविण्यात आली आहे. प्रतिप्रवासी एक रुपया विविध करार करणाऱ्यांकडून पाच ते पंधरा ५० रुपये अतिरिक्त दरवाढ करण्यात आली आहे.
महामंडळातर्फे अपघातातील मृत वा जखमी प्रवाशांसाठी वाढीव आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजना राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या अध्यक्षांच्या सूचनेप्रमाणे एसटीने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या अपघात सहाय्यता निधी योजनेंतर्गत अपघातामध्ये मृत, अपंगत्व आलेल्या प्रवाशांना, तसेच अन्य अपघातग्रस्त घटकांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम वाढविणे देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईत काहीअंशी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या शासननिर्णयानुसार एप्रिल २०१६ पासून योजनेची अंमलबजावणी करण्याचे सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना आदेशित करण्यात आले आहे.

..असा होणार निधी वसूल
यानिधीच्या रकमेचा समावेश मूळ तिकिटाच्या प्रारूपात करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. तशी तांत्रिक प्रणाली विकसित होईपर्यंत प्रवासी पास देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांकडून वाढीव रक्कम वेगळी वसूल करावयाची आहे. या वाढीव शुल्कातून विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे. प्रवाशांना तिकीट देतेवेळी स्वतंत्र एक रुपयाचे तिकीट देणे वाहकांना बंधनकारक राहणार आहे.