आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कामगार संघटनेचे वार्षिक अधिवेशन गाजणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कामगार संघटना आणि एसटी प्रशासन यांच्यात हाेऊ घातलेला वेतनकरार हा सातव्या वेतन अायाेगानुसार व्हावा, यासह विविध प्रलंबित मागण्यांवरून महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे वार्षिक अधिवेशन गाजण्याचे संकेत अाहेत. येत्या २८ फेब्रुवारीला हे अधिवेशन हाेत असून, हजाराे कर्मचारी त्यात सहभागी होणार अाहेत.

नागपूर येथे महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अधिवेशन हाेत अाहे. त्यात एसटी कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी शासनासमाेर मांडण्यात येणार असून, २०१६ ते २०२० या कालावधीसाठी होत असलेला वेतनकरार हा सातव्या वेतन अायाेगानुसार करण्यात यावा, ही प्रमुख मागणी या अधिवेशनातून केली जाणार अाहे. इंटकप्रणीत कर्मचारी संघटनेनेदेखील २०१२-१३ चा करार रद्द करून तत्काळ २५ टक्के वेतनवाढ द्यावी, अशी मागणी दाेन महिन्यांपूर्वी संपाद्वारे केली हाेती. त्यामुळे वेतन कराराचे श्रेय आपल्या पदरी घेण्यासाठी आता दाेन्ही संघटनांमध्ये चढाअाेढ सुरू झाली अाहे. त्यामुळे अधिवेशनात महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या अजेंड्यावरदेखील वेतनकराराचा मुद्दा अग्रस्थानी राहण्याची चिन्हे अाहेत.

तसेच, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे काेणत्याही सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचारी म्हणून घाेषित करावे अाणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे साेयीसुविधा द्याव्यात, अशी मागणीदेखील आगामी अधिवेशनात केली जाण्याची शक्यता अाहे.

अशीही राहणार मागणी
अधिवेशनातसातव्या वेतन अायाेगानुसार वेतनकरार करण्याची मागणी केली जाणार असून जाेपर्यंत करार हाेत नाही, ताेपर्यंत कर्मचाऱ्यांना सरसकट २५ टक्के वेतनवाढ मिळावे अशी मागणीही, या वेळी केली जाणार अाहे.