आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Standard Third, Fourth, Fifth Students Get New Book From June

इयत्ता तिसरी, चौथी, पाचवीतील विद्यार्थ्‍यांना जूनपासून मिळणार नवी पुस्तके !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नवीन शैक्षणिक वर्ष 2014-15 मध्ये इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यामुळे जून महिन्यात बालभारतीची नवीन पुस्तके बाजारात येणार आहेत. या बदललेल्या अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडणार आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. पाठ्यपुस्तके बदलाबाबत राज्यातील सर्व अधिकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर संबंधितांनी नोंद घेण्याचे त्यात कळवले आहे. जून 2014 ला तिसरी, चौथी, पाचवीची पुस्तके बदलणार आहेत, तर त्यापुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे जून 2015 पासून सहावी, सातवी व आठवीचा अभ्यासक्रम बदलणार असल्याचे बालभारतीच्या वतीने कळविण्यात आले.
इयत्ता तिसरी
बालभारती भाषा 8
गणित भाषा 8
माय इंग्लिश बुक थ्री भाषा 7
अनिवार्य मराठी (मराठीशिवाय अन्य भाषेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी)
परिसर भूगोल (जिल्हा भूगोलासह)
इयत्ता चौथी
बालभारती भाषा 8
गणित भाषा 8
माय इंग्लिश बुक फोर भाषा 7
अनिवार्य मराठी (मराठीशिवाय अन्य भाषेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी)
परिसर अभ्यास भाग 1 भाषा 8
परिसर अभ्यास भाग 2 भाषा 8
इयत्ता पाचवी
बालभारती भाषा 8
गणित भाषा 8
माय इंग्लिश बुक फाइव्ह भाषा- 7
परिसर अभ्यास भाग 1 भाषा - 8
परिसर अभ्यास भाग 2 भाषा - 8
सुलभभारती (संपूर्ण) भाषा - मराठी,
व हिंदी
सुगमभारती (संयुक्त) भाषा - मराठी
हिंदी व कन्नड
तारुफे उर्दू भाषा - उर्दू
सिंधूभारती भाषा - सिंधी अरेबिक
सरलभारती भाषा - तेलगू
गुजराती साहित्य परिचय भाषा - गुजराती
नोंद घेण्याची सूचना
बदलणा-या पाठ्यपुस्तकाबद्दल शासनाने परिपत्रकाद्वारे सर्व पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतरांना कळवले आहे. त्यांनी त्याची नोंद घ्यायला हवी, जेणेकरून पाठ्यपुस्तकांचा अनावश्यक साठा शिल्लक राहणार नाही.’’
वाल्मीक पगार, व्यवस्थापक, बालभारती.