आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाॅटरग्रेस प्रकरणावरून ‘स्थायी’चा हल्लाबाेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काळ्या यादीत असलेल्या वाॅटरग्रेस प्राॅडक्ट्स प्रकरणात कायदेशीर नाेटिसा मिळाल्यानंतर स्थायी समितीने अाक्रमक पवित्रा घेत प्रशासनच सर्वस्वी जबाबदार असल्याचा पवित्रा घेत त्यांनी घेतलेल्या माहितीच्या अाधारेच स्थायी समितीने सर्व निर्णय घेतल्याचा दावा केला. प्रशासन चुकीची माहिती देत असेल, तर त्याची शिक्षा त्यांनीच भाेगली पाहिजे, असे सांगत प्रसंगी सदस्यांना अडचणीत अाणणाऱ्या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी ठेकेदाराची पाठराखण करू, असा इशाराही स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिला.

जैविक घनकचरा संकलनाची ९५ लाखांची थकबाकी काळ्या यादीतील समावेश यामुळे साधुग्रामच्या स्वच्छतेचा ठेका वाॅटरग्रेस प्राॅडक्ट्सला देण्यास स्थायी समितीने नकार दिला हाेता. स्थायी समितीवर प्रस्ताव अाणल्यानंतर त्यासाेबत लेखा परीक्षण अहवाल हाेता. यात वाॅटरग्रेसवर अाक्षेप असल्यामुळे स्थायीने दुसऱ्या क्रमांकावरील क्रिस्टल कंपनीला काम दिले. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. थकबाकीदार काळ्या यादीत नसल्याचा युक्तिवाद वाॅटरग्रेसने केल्यानंतर या प्रकरणात उचित निर्णय घेण्याचे अादेश स्थायी समितीला दिले. स्थायीने त्यानुसार उचित निर्णयासाठी प्रशासनाकडून लेखी माहिती मागवल्यावर वाॅटरग्रेसकडील थकबाकी काळ्या यादीत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात अाले. त्या अाधारावर क्रिस्टल कंपनीला काम दिल्यानंतर स्थायीच्या अादेशानुसार कार्यारंभ अादेश दिलेच नाहीत. तिकडे न्यायालयाने पुन्हा फटकारल्यावर तिसऱ्याच ठेकेदाराला काम दिले गेले. सर्वात कमी दराची निविदा असताना काम डावलल्यामुळे वाॅटरग्रेसने अायुक्त, अतिरिक्त अायुक्त स्थायी समिती सभापती, सदस्यांना नाेटिसा दिल्या. त्यावर स्थायी समितीत मुद्दा उपस्थित झाल्यावर प्रा. कुणाल वाघ यांनी वाॅटरग्रेसला काम प्रशासनाच्या कागदपत्रांच्या अाधारेच नाकारल्याचे लक्षात अाणून देत या प्रकरणी जर दाेषी काेणी असेल, तर अायुक्त वा अाराेग्य विभागच असल्याचे स्पष्ट केले. यशवंत निकुळे यांनी अाराेग्य विभागातील अधिकारीच घरभेदी असल्याचे सांगत प्रशासनाविराेधात कारवाई करून ठेकेदारांना मदत करीत असल्याचा अाराेप केला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करणे हाच एकमेव धडा असेल, असे स्पष्ट केले.

ताेंड दाखवण्यासाठी तरी जागा ठेवा?
वारंवार चुकीची माहिती देणे, माहिती देण्यासाठी टाळाटाळ करणे दुसरीकडे ठेकेदाराला अाराेग्य विभागात खुर्चीत बसवून अावश्यक कागदपत्रे पुरविणे, असे प्रकार समक्ष बघितल्याचे सांगत सभापती चुंभळे यांनी ताेंड दाखवण्यासाठी तरी जागा ठेवा, असा टाेला अाराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना लगावला. पैसा येईल जाईल. मात्र, पदाला काळिमा फासला जाईल असे कृत्य करू नका, असेही सुनावले. मध्यरात्री ठेकेदारांबराेबर अधिकारी करतात तरी काय, असा सवाल करीत वाॅटरग्रेस प्रकरणात कारवाईची वेळ अाली, तर अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल, असेही सांगितले.