आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाॅवर’फुल अधिका-यास स्थायी समितीमध्ये अभय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सातपूर येथील मंगल कार्यालयाजवळ एका ‘पॉवर’फुल अधिकाऱ्याच्या नातेवाइकाच्या लग्नासाठी झालेल्या रोषणाईचा मुद्दा स्थायी समितीत उपस्थित झाला खरा. मात्र, अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक प्रकरणांवर चर्चा नकाे, असे कारण देत स्थायी समितीचे सभापती अॅड. राहुल ढिकले यांनीच मुद्दा निकाली काढल्यावर अधिकाऱ्यांनाही एकप्रकारे अभय मिळाले.
शहरातील 70 टक्के रस्ते बंद पथदीपांमुळे अंधारात असल्याची तक्रार प्रत्येक सभेत नगरसेवक करीत अाहेत. वादग्रस्त एलईडीचा ठेका रद्द करण्यासाठी स्थायी समितीनेच पुढाकार घेतला अाहे. वारंवार मागणी करूनही पथदीपांचे साहित्य मिळत नसल्यामुळे मध्यंतरी तीन काेटी रुपयांचे विद्युत साहित्य खरेदीला मंजुरीही देण्यात अाली. त्यानंतरही साहित्य मिळत नसल्याची तक्रार प्रा. कुणाल वाघ यांनी केली. ते म्हणाले की, नगरसेवक खाेटे बाेलतात म्हणून की काय, एका पत्रकाराला अधिकाऱ्याकडे फाेनवरून पथदीपाचे साहित्य अाहे का, याची विचारणा करण्याची विनंती केली. त्याने फाेन केल्यावर साहित्य नसल्याचे उत्तर मिळाले. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील पथदीप दुरुस्तीसाठी पैसे नाहीत दुसरीकडे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीतयार केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांवरील विद्युतीकरणाची कामे कशी मंजूर हाेतात, असा मुद्दा उपस्थित केला. सिंहस्थाची कामे शहरात सुरू असल्यामुळे विशिष्ट रस्त्यांचीच कामे का गृहीत धरली, असाही जाब विचारला. वाघ यांचा राेख सातपूरमधील लखलखाटाकडे असल्याचे चित्र असताना त्यांचा विषय बंद झाला. मात्र, पुढे त्याचाच धागा पकडून काँग्रेसचे नगरसेवक राहुल िदवे अाक्रमक झाले. प्रभागातील किरकाेळ कामांच्या फायली मंजूर नाहीत.
ज्या कामांना अायुक्त महासभेची मान्यता अाहे, त्यांच्यावर कारवाई हाेत नाही. ज्या रस्त्यांवर विद्युतीकरणाची गरज नाही तेथे कामे हाेत असल्याचा अाराेप करीत सातपूर येथे एका अधिकाऱ्याच्या नातेवाइकाच्या लग्नासाठी कसे पथदीपांचे साहित्य पाेहोचले, असा सवाल केला. एकीकडे वारंवार तक्रारी करून ड्रीम सिटी येथील रस्त्यावर एक केबलचा तुकडा लावलेला नाही. दुसरीकडे येथे तजवीज करण्यासाठी साहित्य काेठून अाले, असाही सवाल केला. यावर नगरसेवकांनी संबंधित पाॅवरफुल अधिकारी काेण, अशी विचारणा सुरू केल्यावर सभापतींनी वैयक्तिक वादाला फाटा देत विषयावर पडदा टाकला.
नगरसेवक बचावात्मक
प्रशासनावरिनयंत्रण ठेवून विकासकामे करून घेण्याची हाताेटी असणाऱ्या अनेक नगरसेवकांनी ‘पाॅवर’फुल अधिकाऱ्याविषयी बाेलणे टाळले. दिवे यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अधिकाऱ्याचे नाव जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. राेष अाेढवणार नाही, अशा पद्धतीने नगरसेवक प्रश्न उपस्थित करीत असल्याचे बघून सभापतींनाच यावर पडदा पाडावा लागला.