आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीडीअार घाेटाळ्याबाबत स्थायीचे संशयास्पद माैन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विकास अाराखड्यातील एकीकडे साडेचारशेहून अधिक अारक्षणे सुमारे साडेपाच हजार काेटी रुपयांचा निधी नसल्यामुळे अडचणीत असताना मागील काळात काही अारक्षणे संपादन करताना टीडीअार राेख माेबदला अशा दाेन्ही स्वरूपाचे लाभ देऊन केलेल्या कथित घाेटाळ्याच्या चाैकशीचा स्थायी समितीलाच विसर पडल्याचे चित्र अाहे. मे महिन्यात स्थायीच्या १६ सदस्यांनी पत्र देऊन १९९६ पासून जमिनी संपादित करताना टीडीअार राेख माेबदल्याची प्रकरणे किती याबाबत मागवलेल्या माहितीबाबत अाता स्थायी समिती सदस्यांनीच संशयास्पद माैन बाळगल्यामुळे अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.

महापालिकेत अलिकडेच विकास अाराखड्यातील अारक्षणे व्यपगत हाेण्याचे प्रमाण वाढले अाहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे महापालिकेचा विकास अाराखडा अस्तित्त्वात येऊन वीस वर्षापेक्षा अधिक काळ झाला. मुळात अाराखड्याची मुदतच वीस वर्षे इतकी असते. त्यात जमिनीवर अारक्षण टाकल्यानंतर संपादन करण्यासाठी दहा वर्षापेक्षा अधिक काळ लागला तर जमीनमालकाला जागेवर पुन्हा हक्क सांगता येताे. भूसंपादन अधिनियममधील १२७ च्या नाेटिशीनुसार जागा संपादित करा अन्यथा परत द्या अशी मागणी त्यास करता येते. अाजघडीला अशा मागणीच्या नाेटिसांचा पाऊसच पडत असून बरीचशी अारक्षणे न्यायालयीन लढाई लढून जागामालकांनी परतही मिळवली अाहे.

दरम्यान, काही ठरावीक जागामालकांच्या जमिनी घेण्यासाठी महापालिकेत माेठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय मध्यंतरी सदस्यांनी व्यक्त केला हाेता. काही प्रकरणात उच्च न्यायालयात बाजूने निकाल लागल्यानंतरही सर्वाच्च न्यायालयात विराेधात निकाल लागेल, अशी भीती दाखवत दाद मागितली गेली नाही. तर काही ठिकाणी उच्च न्यायालयात विराेधात निकाल लागल्यावर सर्वाच्च न्यायालयाकडून दाद मिळणार नाही अशी कारण देत महापालिकेने माघार घेतली. थाेडक्यात सर्वाच्च न्यायालयाचा मार्गच पालिकेला नकाे असल्याचे चित्र निर्माण झाले हाेते. या सर्वात काही माेठ्या विकसकांना रस्ते अन्य माेठ्या अारक्षणे संपादन करताना, टीडीअार राेख माेबदला असे दाेन्ही लाभ दिल्याची चर्चा हाेती. १९ मे राेजी स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्यानंतर सदस्यांनी एकजूट दाखवत १९९६ पासून अारक्षणे संपादन कसे झाले, त्यासाठी माेबदल्याकरिता काेणता पर्याय वापरला गेला याची माहिती मागवली हाेती. प्रत्यक्षात, तीन महिने उलटण्याची वेळ अाल्यानंतरही टीडीअारबाबत स्थायी समितीने चकार अवाक्षर काढलेले नाही.

गेडामांच्याही हाेणार हाेत्या कानगाेष्टी
जूनमधीलस्थायीच्या सभेत दिनकर पाटील यांनी टीडीअारची माहिती कधी देणार, असा प्रश्न करीत नगररचना विभागाला धारेवर धरले हाेते. पालिकेला माेठे अार्थिक नुकसान झाल्याचा संशय व्यक्त करीत माेठ्या माशांची माहिती असल्याचा दावा केला हाेता. त्यावर तत्कालीन अायुक्त डाॅ. गेडाम यांनी नावे जाहीर करा, असे सांगितले. मात्र, पाटील यांनी केबिनमध्ये येऊन सर्व माहिती सादर करू, असे सांगितले हाेते. प्रत्यक्षात गेडामांची बदली हाेऊन महिना उलटला असून, अाता स्थायी समिती अशा गैरप्रकारांची माहिती विद्यमान अायुक्त अभिषेक कृष्णा यांना देतात का हे बघणे महत्त्वाचे अाहे.
बातम्या आणखी आहेत...