आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्तित्वात नसलेल्या प्रस्तावांना सभेत मंजुरी , स्थायी समिती सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अस्तित्वातच नसलेल्या प्रस्तावांना स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्याचा अजब प्रकार सभापती सलीम शेख यांनी गुरुवारी (दि. २१) केला. या कृतीवर स्थायीच्या सदस्यांनी तीव्र अाक्षेप नाेंदवित अशा प्रकारचे वर्तन म्हणजे भ्रष्टाचाराला कुरण माेकळे करून देण्यासारखे असल्याचे सांगितले. दरम्यान, सभेत भूसंपादनासाठी कलम १२७ची नाेटीस प्राप्त असलेल्या तीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात अाली. उर्वरित १३५ काेटींचे प्रस्ताव तहकूब ठेवण्यात अाले.
सभापती सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भूसंपादनाचे १८ प्रस्ताव सादर करण्यात अाले हाेते. हे सर्व प्रस्ताव शंका उपस्थित करणारे असून, १९९० पासून भूसंपादनाची कार्यवाही अधिकाऱ्यांनी का केली नाही, असा सवाल दिनकर पाटील यांनी केला. हे प्रस्ताव मंजूर केल्यास पैशांची तरतूद काेठून करणार, असा प्रश्न प्रकाश लाेंढे यांनी उपस्थित केला. भूसंपादन खर्च मिळाल्यामुळे चार अारक्षणे व्यपगत झाली असल्याचे सांगत यशवंत निकुळे यांनी विकास अाराखड्यातील रस्त्यांचे विषय मंजूर करण्याची मागणी केली. प्राधान्यक्रम ठरवून प्रस्तावांना मंजुरी द्यावी, असे अशाेक सातभाई यांनी सांगितले. यावेळी कलम १२७ची नाेटीस प्राप्त तीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात अाली. अग्निशमन सुरक्षा शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवत तातडीने जादा विषयांना मंजुरी देत राष्ट्रगीताने सभेचा समाराेप झाला. याविषयी सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत जादा विषय सभापटलावर सादर करावे त्यानंतरच मंजुरी घ्यावी, अशी मागणी केली. यावेळी दिनकर पाटील, प्रकाश लाेंढे, संजय साबळे, समाधान जाधव, रंजना पवार अादी सदस्यांनी सभापतींच्या कृतीचा निषेध करीत अापल्याला सभेत बाेलूच दिले जात नसल्याचा अाराेप केला. शहरात अतिक्रमण, डासांचा उच्छाद, कमी दाबाने गढूळ पाणीपुरवठा यांसारख्या समस्यांनी नागरिक हैराण झाले असताना या विषयावर चर्चा करू दिली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरसचिवही म्हणतात, प्रस्तावच नाही
जादा विषयांना मंजुरी दिल्याचे सभापती सलीम शेख यांनी जाहीर केले. हे विषय काेणते, असे नगरसचिव डी. एन. जुन्नरे यांना पत्रकारांनी विचारले असता, संध्याकाळपर्यंत येणारे प्रस्ताव असतील असे त्यांनी सांगितले. म्हणजेच अस्तित्वात नव्हते अशा प्रस्तावांना सभेत मंजुरी दिल्याचे स्पष्ट झाले.

भूसंपादन माेबदला द्यावाच लागेल
^भूसंपादन प्रकरणी बाजारमूल्यावर १२ टक्के दराने पालिकेकडून व्याजाची अाकारणी हाेत अाहे. हे पैसे देणे गरजेचेच अाहे. शिवाय, काही प्रकरणांत न्यायालयाचा निकाल लागलेला असल्याने न्यायालयाचा अवमान हाेऊ शकताे. त्यामुळे भूसंपादनाच्या माेबदल्याचा यापुढे गांभीर्याने विचार करावा लागणार अाहे. अन्यथा, पालिकेने अापली मालमत्तेची जरी विक्री केली तरीही माेबदल्याचे पैसे फेडता येणार नाही. - सलीम शेख, सभापती, स्थायी समिती

सभेत भूसंपादनाचे हे प्रस्ताव मंजूर
{विहितगाव शिवारातील सर्व्हे क्रमांक २४/५ , ६अ/१ मधील क्रीडांगण, प्राथमिक शाळा अाणि १२ १५ मीटर रस्त्यात बाधित हाेणारे क्षेत्राचे भूसंपादन
{ चेहडी शिवारातील सर्व्हे क्रमांक १२७ / ३२ / / ग, ३२/ मधील अारक्षण व्यावसायिक संकुल १८ मीटर रस्त्याने बाधित हाेणारे क्षेत्र संपादित करणे
{ दसक शिवारातील सर्व्हे क्रमांक ४९/ मधील क्रीडांगण रस्त्यात बाधित हाेणारे क्षेत्र संपादित करणे