नाशिक- स्थायी समिती सदस्य म्हणून वर्णी लागण्यासाठी मनसे व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे रात्री उशिरापर्यंत लॉबिंग सुरू होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता होणार्या विशेष महासभेत कोणाची नियुक्ती होते, याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 28 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीच्या विद्यमान सदस्यांची मुदत संपली. त्यानंतर एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या सात सदस्यांचे राजीनामे घेण्यात आले. यात मनसेचे चार, तर राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांचा समावेश होता.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली. यापूर्वी 5 जून रोजीची विशेष महासभा केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रद्द झाली. दरम्यान, मंगळवारी महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार असून, सभेपूर्वी दोन्ही पक्षाचे गटनेते महापौरांकडे बंद लिफाफ्यात सदस्यांची नावे देतील.