आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेला शह देण्यासाठी शिवसेनेचे ‘रिपाइं कार्ड’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसे,राष्ट्रवादी अपक्षांच्या युतीमुळे सहज भासणारी स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक रिपाइं उमेदवारासाठी शिवसेना, भाजप काँग्रेसची महाअाघाडी झाल्यामुळे रंगात अाली अाहे. फैसला बुधवारी हाेणार असून, मनसेचे सलीम शेख रिपाइंचे प्रकाश लाेंढे यांच्यात सरळ सामन्याची शक्यता अाहे.
सभापतिपदासाठी नऊ मतांचे संख्याबळ निर्णायक ठरणार अाहे. मनसेकडे पाच, राष्ट्रवादीकडे तीन, तर अपक्ष एक मिळून नऊचा अाकडा पार हाेऊ शकताे. काँग्रेसही या अाघाडीसाेबत असल्यामुळे मनसेला चिंता नव्हती. गेल्या वेळी राष्ट्रवादीला चाल दिल्यानंतर अखेरच्या वर्षी मनसेने सभापतिपदासाठी दावा केला. सभागृहनेते सलीम शेख यांचे नाव मनसेकडून निश्चित झाले. ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीने अर्ज दाखल केल्याने शेख यांनी रीतसर उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी अपक्ष अाघाडीचेच नेते उपस्थित हाेते.

मनसेने याेग्य मानसन्मान दिल्याचे कारण करीत काँग्रेसने महाअाघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. दुसरीकडे, शिवसेनेने पुरेसे संख्याबळ नसताना मित्रपक्ष रिपाइंच्या माध्यमातून मनसेला झटका देण्याची खेळी खेळली. त्यानुसार गटनेते प्रकाश लाेंढे यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसलाही थेट शिवसेनेला मदत करता रिपाइंच्या नावाखाली खेळी करण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला अाहे. भाजपकडून दिनकर पाटील यांचा अर्ज दाखल झाला असून, त्यांची दाेन मते असल्याने तसेच काँग्रेस त्यांना मतदान करणार नसल्यामुळे सर्वांची साेय म्हणून रिपाइंला संधी देण्याचे पुढे अाले.

काहीही झाले तरी सभापती सातपूरचाच...
मनसेचे सलीम शेख, रिपाइंचे प्रकाश लाेंढे भाजपचे दिनकर पाटील हे तिन्ही उमेदवार याेगायाेगाने सातपूरचेच असल्यामुळे काहीही झाले तरी हे महत्त्वाचे पद अामच्याच विभागात येणार असल्याची चर्चा सातपूरमध्ये रंगली अाहे.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन मागवणार
सत्तेत सहभागी झाल्यानंतर मनसे राष्ट्रवादीकडून सातत्याने हाेणारी हेळसांड लक्षात घेत निवडणुकीच्या अखेरच्या वर्षी दाेघांना धडा शिकवण्याचा पण काँग्रेसने केला अाहे. त्यानुसार रिपाइंच्या उमेदवाराला मतदान करण्यात काहीच अडचण नसल्याची बाब पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली जाणार असल्याचे काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनी सांगितले. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मनसेची अडचण वाढणार अाहे.

चळवळीस न्याय
डाॅ.बाबासाहेब अांबेडकर यांच्या शतकाेत्तर राैप्यमहाेत्सवी वर्षाच्या निमित्ताने दलित समाजातील उमेदवाराला सभापतिपदाची संधी द्यावी, असे अावाहन लाेंढे यांनी केले अाहे. शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांनीही शाहू-फुले-अांबेडकर चळवळीला न्याय देण्यासाठीच शिवसेनेने लाेंढे यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज सदस्यांना वळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. मनसेतील एका सदस्यालाही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले अाहेत.

बातम्या आणखी आहेत...