आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समिती निवडीवरून राष्ट्रवादीत घमासान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जिल्हापरिषदेतील विविध समित्यांवरील 23 रिक्त जागा भरण्यासाठी बोलावलेली सर्वसाधारण सभा राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाने ‘विशिष्ट व्यक्ती’च्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे बुधवारी तहकूब करावी लागली. माजी खासदार समीर भुजबळ यांनी दूरध्वनीद्वारे मध्यस्थी केल्यानंतरही कृष्णराव गुंड, शैलेश सूर्यवंशी यांच्याविरोधात दाखल केलेले अर्ज राष्ट्रवादीच्या संगीता ढगे भाजपच्या मनीषा बोडके यांनी मागे घेतले नाहीत. वाद झालेल्या दाेन जागांपैकी एक राष्ट्रवादीची, दुसरी जागा भाजपकडे असली तरी भाजपला सभापतिपद दिल्यामुळे स्थायीच्या दाेन्ही जागा राष्ट्रवादीने ताब्यात घेण्याचे िनयाेजन केले. त्यानुसार बुधवारी सकाळी भुजबळ फार्मवर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोणाला संधी ते ठरले. त्याप्रमाणे पदे मिळाल्याने हा वाद झाला.
जिल्हा परिषदेत आहेर यांना धक्का, राष्ट्रवादीकडे दोन्ही महत्त्वाच्या समित्या
आजारीअसल्यामुळे भाजपच्या केदा आहेर यांना शिक्षण आरोग्य समितीऐवजी कृषी पशुसंवर्धन समिती देण्यात आली. राष्ट्रवादीत बांधकाम अर्थ समितीवरून सुरू असलेल्या दावेदारीत उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांचे पारडे जड झाल्यामुळे त्यांना संबंधित समिती मिळाली, तर किरण थोरे यांना शिक्षण आरोग्‍य समिती सभापतिपद मिळाले. आहेर यांच्या समर्थकांनी मात्र देवळ्यात फलक लावून त्यात शिक्षण आरोग्य समितीचे सभापती असा आहेर यांचा पदाभिषेक केला होता.
कामकाजाविरोधातही कायदेशीर प्रश्न
समितीवाटप समिती रिक्त जागा भरण्यासाठी बोलावलेली सभा तहकूब करण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे अन्य सदस्यांनी केला. सभा तहकूब असेल, तर समिती वाटपाचा निर्णय रद्द करा, अशीही मागणी केली जाणार आहे. छाननीसाठी पंधरा मिनिटांऐवजी दोन तास घेतल्याबाबत आक्षेप घेत काँग्रेस भाजपचे नगरसेवक त्यासाठी एकत्र येणार असल्याचे समजते. त्यामुळे कारकीर्दीतील पहिलीच सभा अध्यक्षांसाठी वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत.
अध्यक्षांविरोधात झाली ‘आघाडी’
राष्ट्रवादीतीलप्रबळ दावेदारांना डावलून अपक्ष विजयश्री चुंभळे यांना अध्यक्षपद दिल्यामुळे मोठी आघाडी त्यांच्याविरोधात सक्रिय आहे. त्यामुळेच छाननीत दोन तास गेल्याचे बघून महिला सदस्य निर्मला गिते यांच्यासह राष्ट्रवादीचे गोरख बोडके, प्रवीण गायकवाड, कॉंग्रेसचे संदीप गुळवे, डॉ. प्रशांत सोनवणे यांच्यासह सदस्यांनी सभा रद्द करण्याची मागणी केली. गिते यांनी तर अध्यक्षा बाहेरून येणाऱ्या फाेननुसार त्या कामकाज करत असल्याची टीका केली. पदाधिकारी येत नसल्याचे बघून सभागृह सोडण्याची तयारी सदस्यांनी केली; मात्र नाचक्कीच्या भीतीने पदाधिकारी व्यासपीठावर आले सभा तहकूब करण्यात आली.