आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार कंपनीचे सर्वच चॅनल्स शहरात बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्टार कंपनीच्या प्रत्येक चॅनेलसाठी अ-ला कार्टे पद्धतीनुसार १० नोव्हेंबरपासूनच स्वतंत्र दर आकारण्याचे आदेश असल्याने आता शहरातील चारही एमएसओंनी (मल्टिसिस्टिम ऑपरेटर) स्टार कंपनीचे सर्वच चॅनल्स बंद केले आहेत. केवळ ग्राहकांच्या मागणीनुसार चॅनल सुरू ठेवण्यात येणार असून, त्यासाठी ग्राहकांना आपला मागणी अर्ज भरून द्यावा लागणार असल्याचे एमएसओंच्या वतीने सांगण्यात आले आहे.
स्टार कंपनीने टीडीसॅटमध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर करत आपल्या प्रत्येक चॅनलसाठी स्वतंत्र दर आकारणीस परवानगी मिळावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार टीडीसॅटने वरील आदेश िदले. केबल कंपन्यांनीही या आदेशाची अंमलबजावणी सुुरू केली आहे. त्यामुळे शहरातील डेन कंपनीने सोमवारी आपले सर्व चॅनल्स बंद केले होते, तर स्टार प्लस हे एकमेव चॅनल मंगळवारी सायंकाळपासून बंद करण्यात आले आहे. इन केबलनेही स्टार प्लस आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिन्या सुरू ठेवत इतर सर्वच चॅनल्स बंद केली.
हाथवे कंपनीची मात्र ८-९ चॅनल्स बंद असून, २१-२२ चॅनल्स सुरूच आहेत. त्यामुळे डिजिटलायझेशनच्या निर्णयाबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याने आणि चॅनल्सच्या पॅकेजबाबत एमएसओ आणि ब्राॅडकास्टर्सचे सूत जुळत नसले, तरीही आता मात्र त्यांना पॅकेज पद्धतीचा अवलंब करावाच लागणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट होत आहे.

तीनमहिने चॅनल बंधनकारक
एकदाग्राहकाने चॅनल घेतल्यास कमीत कमी त्याला ते तीन महिन्यांपर्यंत कायम ठेवावे लागेल. त्यामुळे चॅनल बंद करण्याची मागणी केली, तरीही आता शुल्क भरावेच लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महिन्याचेच दर सांगावेत
प्रतिचॅनल्सस्वतंत्र दर द्यावे, त्याची आकारणी होणार, कुठल्या कंपनीने ते सुरू केले आणि कोणी नाही याच्याशी मतलब नाही. हवे ते चॅनल्स द्यावेत. प्रतिमहिना परवडेल अशी दर आकारणी करावी, अन्यथा पर्याय शोधावे लागतील. मालतीतिवडे, गृहिणी
सर्वांचे हित महत्त्वाचे
एमएसओज्या दरांची आकारणी करणार आणि ब्रॉडकास्टर्सला किती शुल्क द्यावे लागणार, शिवाय केबलचालकांचा काय फायदा होणार, ग्राहकांचे काय होणार, यांसह नेमके हित कोणाचे, याचा विचार महत्त्वाचा आहे. आनंदखरे, केबलचालक
जुळवाजुळव सुरू
शहरातचार कंपन्यांमार्फत केबल सेवा दिली जाते. परिसरानुसार दरही वेगवेगळे घेतले जातात. परिणामी केबलचालकांकडून स्वत:च काही चॅनल्स ग्राहकांना सूट म्हणून सुरू ठेवत त्याचे भाडे स्वत:च एमएसओंना देण्याची शक्यता आहे. जेथे कमी दर असतील तेथे वाढीव आकारणी केली जाऊ शकते. त्यामुळे आता कुठे मोफत आणि कुठे चॅनल्सनुसार दर आकारावयाचे यासाठी केबलचालकांची जुळवाजुळव सुरू आहे.