आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Start Direct Admission For Second Year Of Engineering

अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्ष प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्रराज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने अभियांत्रिकीच्या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमास थेट द्वितीय वर्षासाठीच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले अाहे. अभियांित्रकीची पदविका पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेता येणार असून, यासाठी दि. जुलैपासून एआरसी सेंटरवरून प्रवेश अर्ज करता येणार आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील एआरसी सेंटरवरून अॅप्लिकेशन कीट खरेदी करून प्रवेश अर्ज भरावयाचा आहे. खुल्या गटासाठी कीटची किंमत ५०० रुपये, तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४०० रुपये आहे.

विद्यार्थ्यांनी दि. ते २५ जुलै दरम्यान ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म भरणे गरजेचे आहे. तर, २३ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या कागदपत्रांची तपासणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या www.dtemaharashtra.gov.in/dse2015 या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे अावाहन संचालनालयाच्या वतीने करण्यात अाले अाहे.

२८ जुलै रोजी जाहीर होणार गुणवत्ता यादी
एआरसीसेंटरच्या माध्यमातून प्रवेश अर्ज भरल्यानंतर २४ जुलै रोजी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. त्यानंतर प्रवेश अर्जांतील दुरुस्तीसाठी २५ ते २७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना विहित मुदत असणार आहे. त्यानंतर २८ जुलै रोजी सायंकाळी वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार अाहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.