आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीए-फार्मसीच्या प्रवेशप्रकियेस प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे २०१५ २०१६ च्या मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए अभ्यासक्रमासाठीच्या प्रथम वर्षाकरिता प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. एमबीएम महाविद्यालयांतील एआरसी सेंटरवरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरावयाचे असून, कॅपराउंडप्रमाणे प्रवेश दिला जाणार आहे.
एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी मार्च महिन्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, दि. २३ रोजी महाविद्यालयांतील उपलब्ध जागा चॉइस कोड क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. दि. २४ ते २६ जून या दरम्यान कॅपराउंड एक होणार असून, विद्यार्थ्यांनी एआरसी सेंटरवरून ऑनलाइन ऑप्शन फॉर्म (अर्ज) भरून कन्फर्मेशन करावयाचे आहे. त्यानंतर दि. २७ रोजी प्रोव्हिजनल अलोटमेंट लिस्ट जाहीर होणार आहे. त्यानुसार दि. २८ ते जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश घ्यावयाचा आहे.
प्रवेशप्रक्रियेची पहिली फेरी पार पडल्यानंतर दि. जुलै रोजी महाविद्यालयांत उपलब्ध जागांनुसार दुसरा कॅप राउंंड सुरू होईल. दि. रोजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरावयाचे आहे. त्यानंतर दि. ते ११ या कालावधीत दुसऱ्या फेरीची प्रवेशप्रक्रिया होईल. या दोन्ही फेऱ्या पार पडल्यानंतर दि. १३ रोजी उपलब्ध जागांनुसार तिसरा कॅपराउंंड घेण्यात येणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी www.dtemaharastra.gov.in/mba2015 या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.
वंचित विद्यार्थ्यांना मिळणार संधी, ऑगस्टला पुन्हा प्रवेश परीक्षा
मास्टर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार असून, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ एमबीए, एमएमएम इन्स्टिट्यूट (एएमएमआय) या संस्थेतर्फे ऑगस्ट २०१५ रोजी प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. रिक्त जागांसाठी तसेच संस्थात्मक स्तरावरील जागांसाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ३० जुलैपर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. ऑगस्टला प्रवेश परीक्षा होईल. तर दि. राेजी परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून, १४ ऑगस्ट प्रवेशासाठीची अंितम मुदत आहेत.
एम. फार्मसीच्या प्रवेशप्रक्रियेसही प्रारंभ
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे २०१५ २०१६ च्या मास्टर ऑफ फार्मसी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, मंगळवारपासून (दि. २३) प्रवेश सुरू झाले आहेत. एम. फार्मसी अभ्यासक्रमाच्या १५ महाविद्यालयांत ४५० जागा आहेत. प्रवेशासाठी २३ जून रोजी राउंड १-ए नुसार स्पॉन्सर्ड गटातील विद्यार्थ्यांना यादीप्रमाणे प्रवेश देण्यात आले. तर राउंड २-बी नुसार खुल्या गटातील विद्यार्थ्यांना २४ ते २६ जूनदरम्यान गुणवत्ता यादीप्रमाणे प्रवेश दिला जाणार आहे. इतर प्रवर्गासाठी २७ जून रोजी प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन नोंदणी करावी. जुलै रोजी जागांची यादी जाहीर होणार असून, त्यानंतर राउंड २-ए सुरू होईल. िदनांक १० जुलैपर्यंत या फेरीतील प्रवेश होणार असून, त्यानंतर १८ जुलै रोजी रिक्त जागांची माहिती जाहीर होईल. २० ते ३० जुलै रोजी संस्थात्मक स्तरावरील जागांचे प्रवेश होतील.
बातम्या आणखी आहेत...