आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारंभ महाविद्यालयात वार्षिक समारंभ उत्साहात; विद्यार्थ्यांचा सत्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक  : समाजात मारामारी, खून, गुंडगिरी, अपघात यांसह इतर घटना घडल्या की, पाेलिसच मदतीला धावून येतात. मात्र अशा घटना पाेलिसांना कळविण्याचे काम अापल्या सगळ्यांचेच अाहे.
अशा घटनांची माहिती विद्यार्थ्यांनी १०० नंबरवर कळविल्यास तत्काळ मदत मिळू शकते. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साध्या वेशातील पाेलिसाची भूमिका पार पाडावी, असे अावाहन पुण्याच्या खडकीतील वरिष्ठ पाेलिस निरीक्षक राजेंद्र विभांडिक यांनी केले. 
 
नाशिकराेड येथील पुरुषाेत्तम इंग्लिश स्कूलच्या अारंभ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नहसंमेलनात शाळेचे माजी विद्यार्थी असलेले विभांडिक बाेलत हाेते. ते म्हणाले की, रस्त्यावर कुठेही मारामारी किंवा काही घटना घडत असेल तर विद्यार्थ्यांनी त्या घटनेची माहिती पाेलिसांना दिली पाहिजे. म्हणजेच पाेलिस वेळेवर पाेहाेचतील अाणि दुर्घटना टळेल. 
 
अध्यक्ष स्थानाहून जयंत माेंढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून शिक्षण घेतल्यास यश दूर नसते. डाॅ. शुभांगी कुलकर्णी सहकाऱ्यांनी स्वागतगीत गायले. विभांडिक यांच्यासह प्राचार्य प्रतापसिंग ठाेके, प्रा. रेखा टर्ले, प्रा. संगीता पवार, मंगला जाधव, प्रदीप वाघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात अाले. टर्ले यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. अानंद खरात यांनी करून दिला. 
 
कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. सुनील हिंगणे, प्रा. गणेश खांबेकर, प्रा. दीपक पर्वतीकर, प्रा. श्रीकृष्ण लाेकडे, प्रा. राजेंद्र शेळके, प्रा. कैलास निकम, प्रा. संगीता मुसळे, प्रा. सुरेखा पवार, प्रा. राजेश खताळे, प्रा. संदीप निकम, प्रा. यशवंत सूर्यवंशी, विलास साेनार, राजेंद्र वाघ, राजू येसुरकर, दत्तू राेडे, धनंजय डावखर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा पंडित यांनी केले. 
 
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा झाला गाैरव 
शैक्षणिकवर्षात झालेल्या सांस्कृतिक क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह ढाल देऊन गाैरविण्यात अाले. तसेच, भावगीत स्पर्धेत प्रथम सरला सराेदे, द्वितीय रूपाली गायधनी, भक्तिगीत स्पर्धेत प्रथम वैष्णवी बाेराडे, द्वितीय पूजा बाेरूडे, निबंध लेखन स्पर्धेत प्रतीक्षा कुलकर्णी, द्वितीय नेहा सावंत, पाककला स्पर्धेत प्रथम सुवर्णा झाल्टे, द्वितीय तैबा अन्सारी, पाेस्टर स्पर्धेत प्रथम नीलेश बाेरस्ते, द्वितीय धनश्री गामणे, रांगाेळी स्पर्धेत प्रथम कावेरी माैळे, द्वितीय दर्शना अाढाव, प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रतिभा लोंढे, साेनया साळवे, कार्तिक नागरे, राेहित जठार यांच्यासह क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांनाही यावेळी गाैरविण्यात अाले. 
 
बातम्या आणखी आहेत...