आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगलमय अमृत कुंभपर्वाच्या आगमनाची शाेभायात्रेने नांदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभपर्वाच्‍या मिरवणुकीत  पारंपरिक वेशातील पुरुष, महिला, बालक - Divya Marathi
कुंभपर्वाच्‍या मिरवणुकीत पारंपरिक वेशातील पुरुष, महिला, बालक
नाशिक - मंत्रपठणाचे धीरगंभीर स्वर... पारंपरिक सनईचे सूर... मिरवणुकीच्या अग्रभागी ठेवलेला मंगलमय अमृतकुंभ.. हरे रामा हरे कृष्णाच्या गजरावर धरलेला फेर... कुठे ढाेल -ताशांचा गजर ...कुठे रणरागिणींची तलवार, दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके तर कुठे दिंड्या - पताकांची फडफड... पारंपरिक वेशातील पुरुष, महिला, बालकांचा अपूर्व उत्साह... अाणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अाेसंडून वाहणारा अभूतपूर्व उत्साह.. अशा भारावलेल्या वातावरणात नाशिकमधील कुंभपर्वाच्या अागमनाची दवंडीच जणू साेमवारच्या धर्मध्वजा मिरवणुकीने पिटण्यात अाली.

दर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभपर्वाच्या निमित्ताने अायाेजित धर्मध्वजा मिरवणुकीत हजाराे अबालवृध्द प्रचंड सहभागी झाले हाेते. काळाराम मंदिरात शास्त्राेक्त धीरगंभीर उच्चारात झालेल्या मंत्रपठण अाणि पूजनानंतर धर्मध्वजा मिरवणुकीच्या अग्रभागी नेण्यात अाली. अन खऱ्या अर्थाने मिरवणुकीत रंगत भरली. एकीकडे वातावरण मंगलमय करणारे सनईचे मंत्रमुग्ध सूर तर दुसरीकडे ढाेल -ताशांच्या गजरावर झेंडे नाचवणारे तरुण- तरुणी. अशा अत्यंत जल्लाेषपूर्ण वातावरणात साेमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास या मिरवणुकीस काळाराम मंदिरापासून प्रारंभ झाला.

त्यानंतर जुन्या शाही मार्गाने ही मिरवणूक जुन्या अाडगाव नाक्यापासून गणेशवाडीकडे वळवण्यात अाली. तिथून ही मिरवणूक अत्यंत जल्लाेषात अायुर्वेद सेवा संघ, दिल्ली दरवाजा, नेहरू चाैक, धुमाळ पाॅंईंट, भगवंतराव मिठाई, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅंडवरून रामकुंडावर नेऊन विसर्जित करण्यात अाली.

बारा वर्षांनी हाेणाऱ्या कुंभमेळ्यास मंगळवारी नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजाराेहणाने प्रारंभ हाेत अाहे. या साेहळ्याच्या पूर्वसंध्येला साेमवारी नाशिकमध्ये काढण्यात अालेल्या शाेभायात्रेत महिला शंखनाद करत साेहळ्याची जणू नांदीच केली.