आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ACB कडून छगन भुजबळ फार्मची इंच इंच माेजणी, तब्बल 3 दिवस सुरू राहील कडक तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई-अाग्रा महामार्गालगत गाेविंदनगर परिसरातील सुमारे शंभर काेटींचे कथित मूल्यांकन असलेल्या भुजबळ फार्ममधील इंच इंच बांधकामांचे मोजमाप महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी केले.

विशेष म्हणजे, या अालिशान ‘प्रासादा’तील प्रत्येक वस्तूची अचूक किंमत निश्चित करण्यासाठी ही फेरतपासणी असल्याचे वृत्त अाहे. म्हणूनच की काय, सार्वजनिक बांधकाम विभाग व काही ख्यातनाम वास्तुविशारदांबराेबरच प्रत्येक वस्तूशी निगडित तज्ज्ञांची मदत घेतली जात असल्याचेही बाेलले जाते. सकाळी ११ वाजता सुरू झालेली तपासणी सायंकाळी ७ वाजता संपली. मात्र पुढील तीन दिवस तपासणी सुरू राहील असेही सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र सदन घाेटाळा, कलिना भूखंड प्रकरण अशा नानाविध कथित घाेटाळ्यांची सुनावणी सुरू असून याच अाराेपाखाली भुजबळ यांच्यासह त्यांचे पुतणे तथा माजी खासदार समीर हेही तुरुंगात अाहेत.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, भुजबळांच्या आलिशान फार्म हाऊसचे 10 फोटो

बातम्या आणखी आहेत...