आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेट बँकेचे कामकाज सुरळीत; मात्र इतर बँकांत चणचण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - करन्सी चेस्टमधली शिल्लक रक्कम संपल्याने अनेक बँकांना स्टेट बँकेचे उंबरठे झिजवावे लागत असले, तरी स्टेट बँकेचे कामकाज सुरळीत सुरू अाहे. उर्वरित बँकांच्या तिजाेऱ्यांत चलनतुटवडा जाणवायला सुरुवात झाल्याने स्टेट बँकेकडून मागणीच्या तुलनेत पुरेसे चलन उपलब्ध हाेत नसल्याने इतर बँकांत पेन्शनर्सच्या हाती हजार-दाेन हजार रुपये ठेवून बाेळवण केली जात अाहे.
बँकांच्या अशा कारभारामुळे ज्येष्ठांचा संताप हाेत अाहे. स्टेट बँकेला अपेक्षित रिझर्व्ह बँकेकडे मागणी केलेली २५० काेटींची रक्कम पाचशेच्या नाेटा अाजही उपलब्ध झालेल्या नाहीत. दरम्यान, एका बाजूला ८० टक्के एटीएम मशिन्सचे कॅलिब्रेशन झाल्याचा दावा बँका करीत असल्या, तरी एटीएमची स्थिती सुधारायला तयार नाही. एचडीएफसी, अायसीअायसीअाय, अॅक्सिस, अायडीबीअाय, बँक अाॅफ बडाेदा, बँक अाॅफ महाराष्ट्र, येस बँक अादी बँकांच्या एटीएमची शटर्स बंद अाहेत. यामुळे मात्र चेक बुकची रिक्वेस्ट टाकणे, अाॅनलाइन फंड ट्रान्स्फर करणे, पिन बदलणे (ज्याचे मेसेज सध्या अनेक बँका ग्राहकांना करत अाहेत) अशी कामेही करता येत नसल्याने नाइलाजाने ग्राहक बँकांत गर्दी करत अाहेत. यामुळे या बँकांनी राेकड नसली तरी इतर कामाकरिता एटीएमची शटर्स उघडण्याची गरज व्यक्त केली जात अाहे. दरम्यान, नाशिकमधील चेस्ट ब्रँच असलेल्या बँकांना उद्या गुरुवारी काही प्रमाणात का हाेईना रक्कम हाती पडेल, अशी शक्यता अाहे.

बँक कापत असलेल्या रकमेचे काय? : काही माॅल्समध्ये क्रेडिट िकंवा डेबिट कार्ड स्वाइप केले तर करापाेटी काेणतीही रक्कम कापली जात नाही. मात्र पेट्राेलपंप, किराणा दुकाने, जनरल स्टाेअर्स, हाॅटेल्ससारख्या ठिकाणी कार्ड‌्सच्या वापरावर ग्राहकाला करापाेटी भुर्दंड बसत अाहे. एका बाजूला ३१ डिसेंबरपर्यंत असे कर अाकारू नयेत, असे केंद्र सरकारने म्हटले असताना असे कर कापण्यामागचे गाैडबंगाल उलगडणे गरजेचे अाहे.

इतर बँकांकडून रकमेची मागणी
^अातापर्यंतअाम्हीअामच्या ग्राहकांना प्राधान्य देऊन इतर बँकांनाही रक्कम पुरवठा करीत अाहाेत. अाता ज्यांच्या करन्सी चेस्ट अाहेत, त्यांच्याकडूनही मागणी सुरू झाली अाहे. अाम्ही ती मागणीही काही प्रमाणात पूर्ण करीत अाहाेत.
-सुनील खैरनार, क्षेत्रीय व्यवस्थापक, स्टेट बँक
बातम्या आणखी आहेत...