नाशिक - कम्फेडरेशन अाॅफ इंडियन इंडस्ट्री (सीअायअाय) या उद्योग जगतातील प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कायझन स्पर्धेतील विजेत्यांची घाेेषणा गुरुवारी (दि. २१) करण्यात अाली. त्या स्पर्धेत माेठ्या उद्याेग गटातून अाैरंगाबादच्या ग्रीव्हज काॅटन लिमिटेड कंपनी, तर लघु आणि मध्यम उद्याेग गटातून ट्राअाे एंटरप्रायजेस, काेल्हापूर या उद्याेगांचे संघ विजेते ठरले अाहेत. कायझन एक्सलन्सी अवॉर्ड मात्र नाशिकच्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या संघाने पटकावला अाहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना ‘सीअायअाय’चे उत्तर महाराष्ट्राचे चेअरमन सुधीर मुतालिक, कायझन अवॉर्ड कमिटीचे राज्याचे अध्यक्ष अाणि जिंदाल साॅ लिमिटेडचे सहायक महाव्यवस्थापक अजय विद्याभानू यांच्या हस्ते गाैरविण्यात अाले. या स्पर्धेत सादर करण्यात अालेल्या संकल्पनांमुळे स्पर्धेचा काळ हा माहितीने भरलेला हाेता. केवळ प्रमुख अतिथींसाठीच नाही, तर ज्युरींकरिताही ही एक उत्तम शिकवणूक ठरल्याचे विद्याभानू यांनी यावेळी सांगितले.
कमीखर्चाच्या, पण जास्त परिणामकारक संकल्पना
सीअायअायकडूनअायाेजित या ११ व्या राज्यस्तरीय कायझन स्पर्धेत १०३ संघांतील ४०० कामगारांनी अापल्या कमी खर्चाच्या, पण जास्त परिणामकारक ठरलेल्या संकल्पनांचे येथे सादरीकरण केले. या संकल्पनांमुळे उद्याेगांच्या उत्पादनक्षमता, उत्पादनाची गुणवत्ता, कंपनीसह समाजाला झालेला फायदा अाणि ग्राहकांचे समाधान साधले गेले अाहे.
कायझन एक्सलन्स अवॉर्ड सुधीर मुतालिक, अजय विद्याभानू अादींच्या हस्ते स्वीकारताना नाशिकच्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतील कामगारांचा संघ.