आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाटक क्र. १७ - ‘निकाल लागणारच नाही’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाटकसंपल्यावर पडदा पडताे खरा, पण राज्यनाट्य स्पर्धेत अाता खरा पडदा उघडला अाहे. स्पाॅट अाहे ताे फक्त ‘निकाल’ या मुख्य पात्रावर, पण दिग्दर्शकाने या मुख्य पात्राला वाक्य अाणि हालचालच दिली नाही...! कारण या निकालात काहीच असणार नाही, असे या दिग्दर्शकाने सांगूनच टाकले अाणि निकालाची नाटकं चांगलीच चर्चेत अाली.
राज्यनाट्य स्पर्धेच्या नाशिक केंद्रावर १६ नाटकं सादर झाली. त्यात अगदी दाेन-तीन नाटकं पारिताेषिकाच्या काठापर्यंत पाेहाेचली असतील असं काेणताही जाणता कलाकार प्रेक्षक सांगेल. त्यामुळे अर्थातच नाशिक केंद्रातून काेणते नाटक अंतिम फेरीत जाणार याची उत्सुकता कमी अाणि जी नाटकं चांगली झाली त्यांच्यात प्रथम-द्वितीय-तृतीय अशी गणती मात्र सुरू झाली. ती गेल्या तीन-चार दिवसांपासूनच सुरू हाेती. पण, काही नाटकांना परीक्षकच झाेपल्याचे पाहून रंगकर्मींनी छुप्या पद्धतीने त्यांचे छायाचित्र काढून ते साेशल मीडियावर व्हायरल करून निषेध व्यक्त केला. स्पर्धेच्या परीक्षकांनी ‘निकाल अामच्या हातात अाहे, नाशिक केंद्रातून एकही नाटक पुढे जाणार नाही, असेही हाेऊ शकते किंबहुना ‘स्पर्धा’ हाेईल असे उत्तम नाटकच झालेले नाही’ अशी कुजबूज केल्याचे ‘अातूनच बाहेर अाली’ अाणि ही चर्चा अंतिम नाटकावेळी चांगलीच रंगली.

जर समजा असे झालेच तर काेणताही संघ काहीच करू शकणार नाही. कारण स्पर्धेचा फाॅर्म भरताना त्यातील अटी अाणि नियमांत ‘परीक्षकांचा निकाल अंतिम राहील’ असेही नमूद असते. त्यामुळे परीक्षकांना ताे अधिकार देण्यात अालेलाच अाहे. पण, परीक्षकांनी जर असा निर्णय घेतला तर चांगलं नाटक सादर केलेल्या संघांवरही नक्कीच अन्याय हाेऊ शकताे. अर्थात परीक्षक जाणते रंगकर्मी अाहेत, एवढा कठाेर निर्णय ते घेणार नाहीत अशी त्याची छायाचित्र व्हायरल केलेल्या रंगकर्मींनाच वाटत अाहे. अाता तर मंचावरची स्पर्धा संपली अाहे पण निकालाची स्पर्धा सुरू हाेऊन ‘निकाल लागणारच नाही’ हे नाट्य काही दिवस तरी (कसाही निकाल जाहीर हाेईपर्यंत) चांगलेच रंगणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...