आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेट परीक्षेचे स्वरूप ‘ऑब्जेक्टिव्ह’च; 10 ते 30 सप्टेंबरदरम्यान भरता येणार अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) अधिव्याख्याता पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा 1 डिसेंबर रोजी होणार आहे. परीक्षेचे स्वरूप बदलण्याबाबत अधिकृत माहिती आयोगाने जाहीर केली नसल्याने डिसेंबरमधील ही परीक्षा सध्याच्या स्वरूपानुसारच होणार आहे.

ऑगस्टपूर्वी जाहीर होणारी तारीख यंदा लांबल्याने बहुपर्यायी प्रश्न पद्धत बदलण्याची शंका वाटत होती. मात्र, आयोगाने तीन दिवसांपूर्वीच तिसाव्या सेटची 1 डिसेंबर ही तारीख जाहीर केली. राज्यात 15 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून ते 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येईल. परीक्षा शुल्क एचडीएफसी किंवा बँक ऑफ महाराष्ट्रच्याच शाखेत चलनाद्वारे भरावयाचे आहे. सर्वसाधारण गटासाठी- 550 रुपये, अनुसूचित जाती/जमाती, अंध व अपंग - 450 रुपये, आर्थिक उन्नत गटात न मोडणार्‍या इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्गीय, भटक्या-विमुक्तांसाठी - 450, तर उन्नत व प्रगत गटासाठी - 550 रुपये शुल्क असेल. अर्जाची प्रिंटआउट व त्यासोबत चलन, पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक, मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला, नावात बदल असल्यास प्रमाणपत्र इत्यादींची झेरॉक्स प्रत जोडावी. अर्ज 36 बाय 25 सेंटिमीटरच्या लिफाफ्यात संबंधित परीक्षा केंद्रावर 7 ऑक्टोबरपर्यंत पाठवावा.

परीक्षेचे स्वरूप सध्याचेच
सध्याच्या बहुपर्यायी पद्धतीनेच परीक्षा होईल. त्यातील प्रश्नांची पातळी उच्च् असून, कुठल्याही प्रश्नाचे उत्तर संबंधित विषय अथवा मुद्याचा सखोल अभ्यास केल्याशिवाय अचूक लिहिता येणे अशक्यच आहे. त्यामुळे हे सध्याचे स्वरूपच कायम राहावे.
-प्रा. सर्जेराव नरवडे, एन. पी. विधी महाविद्यालय, औरंगाबाद