आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Govt Official Arrested Gautam Bhalerao For Accepting Bribe

लाचखोर सहनिबंधक भालेराव रुग्णालयात; चौकशी सुरूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्हा बॅँकेच्या तीन संचालकांवरील कारवाई स्थगित करण्याच्या मोबदल्यात 11 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलेले विभागीय सहनिबंधक गौतम भालेराव यांची पोलिस तपासाच्या दरम्यान प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने येथील संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भालेराव यांच्या राहत्या घराबरोबर कार्यालयाची झडती घेण्यात आली असून, त्यात मालमत्तेची कागदपत्रे, बॅँकांचे विवरण पत्रक, पासबुक, दहा हजारांची रोकड व दागिने खरेदीच्या पावत्या हाती लागल्या .

शुक्रवारी सकाळी 11 वाजता पथकाने कायदेशीर अटकेची प्रक्रिया राबविण्यासाठी भालेराव यांना ताब्यास घेतले असता प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ संदर्भ सेवा रुग्णालयातील विशेष कक्षात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रमाणपत्र मिळताच अटकेची कारवाई करणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.