आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"राज्य नाट्य'ची आज वाजणार तिसरी घंटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातीलहौशी रंगकर्मी वाट बघत असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेला शनिवार (दि. १५) पासून शुभारंभ होत आहे. राज्य नाट्य स्पर्धेचे हे ५४वे वर्ष आहे. परशुराम साइखेडकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी सात वाजता नाटक सादर होतील. या स्पर्धेची सुरुवात अग्नेय नाट्य सेवा मंडळाच्या "द शो मस्ट गाे ऑफ' या नाटकाने होणार आहे.

उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, नाट्यकलेचा प्रचार प्रसार सर्व स्तरांतून व्हावा, सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे, या उद्देशाने शासनाने ही स्पर्धा सुरू केली आहे. नाशिकलाही या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळतो. यंदा नाशिकच्या १५, तर धुळ्याच्या एका संस्थेने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सखाराम बाइंडर, वा गुरू..., कहाणी एका हृदयाची, तुक्याची आवली, दंगल, एक रिकामी बाजू, लास्ट लव्ह स्टाेरी, ही वैरेन वैररक्ष, जस्ट गेम, या वळणावर... छिन्नमस्ता, फक्त प्रेक्षकांसाठी, भागी, छूमंतर, मृगजळ ही नाटके या स्पर्धेत सादर होणार आहेत.

गेल्या ४०-४५ वर्षांपासून सहभागी होणारे विजय नाट्य मंडळ यंदाही स्पर्धेत सहभागी होत आहे हे विशेेष. स्पर्धेतील या नाटकांचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक राजेश जाधव यांनी केले आहे.