आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रतिभासंगम’द्वारे आजपासून विद्यार्थी साहित्याचा जागर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे १५ वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन “प्रतिभासंगम” नाशिकमध्ये दि. २३, २४ २५ सप्टेंबरला रावसाहेब थोरात सभागृहात वसवलेल्या महाकवी वामनदादा कर्डकनगरात होत आहे. या संमेलनाचे उद‌्घाटक म्हणून कादंबरीकार विश्वास पाटील उपस्थित राहतील.
साहित्य संमेलनाच्या सुरुवातीस शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ५.३० वाजता कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद‌्घाटन होईल. तत्पूर्वी दुपारी वाजता सावानाचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांच्या हस्ते ग्रंथदिंडीस कुसुमाग्रज निवासस्थान येथून शुभारंभ होईल. रात्री ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात अाले अाहे. शनिवारी (दि. २४) सकाळी वाजता ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांची प्रकट मुलाखत, दुपारी वाजता कथाकथन अभिवाचन, सायंकाळी वाजता मुक्तसंवाद तसेच रात्री ८.३० वाजता निवडक विद्यार्थी साहित्यिकांचे कविसंमेलन होणार आहे. रविवारी (दि. २५) सकाळी वाजता ‘भाषा और साहित्य’ या विषयावर प्रा. डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांचे व्याख्यान होईल. सकाळी १०.३० वाजता ‘लेखनस्वातंत्र्य : मर्यादा भान’ या विषयावर विद्यार्थ्यांची परिचर्चा होईल. दुपारी २.३० वाजता ‘साहित्यिकांचा अाविष्कार’ या विषयावर गायक नंदेश उमप यांचे व्याख्यान हाेईल. दुपारी वाजता समारोप पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या हस्ते, तसेच नामांकित वक्ते प्रा. प्रकाश पाठक यांचे व्याख्यान होईल.

या संमेलनासाठी राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्यिकांना खुले निमंत्रण देण्यात आले आहे. या संमेलनात कविता, कथा, वैचारिक लेख, नाट्य, ललित लेख, लघुपट, ब्लॉग, पथनाट्य या साहित्यप्रकारांचा समावेश असेल. या साहित्य संमेलनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या साहित्य संमेलनाच्या नगराला “महाकवी वामनदादा कर्डक” असे नाव देण्यात आले आहे. प्रदर्शनी कक्षाला नाशिकचे सुपुत्र स्व. मुरलीधर खैरनार यांचे नाव देण्यात आले आहे व्यासपीठाला निसर्गकवी स्व. नलेश पाटील नाव देण्यात आले आहे.
तीन दिवस साहित्यकुंभामध्ये समाजातील अधिकाधिक साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन स्वागताध्यक्षा नीलिमाताई पवार, कार्याध्यक्ष महेश दाबक सचिव दिनेश रणदिवे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला महानगर अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत टोपे महानगरमंत्री अमोल अहिरे हे उपस्थित होते.

संमेलनासाठी १५ गट कार्यरत
राज्यस्तरीयप्रतिभासंगम साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी विविध १५ गट तयार करण्यात अाले अाहेत. यात ८० विद्यार्थी कार्यकर्ते काम करीत आहेत. संमेलनासाठी हे विद्यार्थी परिश्रम घेत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...