आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Road Transport Corporation,Latest News In Divya Marathi

एसटीची उद्यापासून भाडेवाढ: प्रवाशांना पुन्हा आर्थिक दणका; दीड महिन्यात दुस-यांदा भाडेवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वाढता तोटा, बसेसची देखभाल दुरुस्ती, डिझेलमध्ये सातत्याने होणा-या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने दीड महिन्याच्या अंतराने दुस-यांदा भाडेवाढ केली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 31) मध्यरात्रीपासून भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे शहर बसेसच्या प्रवासभाड्यातही सात रुपयांच्या ठिकाणी आठ रुपये तर ग्रामीण व लांबपल्ल्याच्या मार्गावरील दोन ते चार रुपयांची भाडेवाढ होणार आहे.

महामंडळाने शासनाला भाडेवाढीसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. त्याला मिळालेल्या मान्यतेनुसार 1 ऑगस्टपासून भाडेवाढ केली जाणार आहे. यात जनता बसेसला 6 कि. मी. पुढील प्रतिटप्प्यास 20 ते 25 पैसे दरवाढ असेल. त्यानुसार वातानुकूलित व जलद, निमआराम बसेसच्या भाड्यात चार ते सहा रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे.
नव्या तिकिटदरांनुसार नाशिक- मुंबईचे सध्याचे भाडे 192 रुपयांवरून थेट 194 तर, पुण्याच्या भाड्यात 223 वरून 225, औरंगाबादचे 211 वरून 213, धुळे मार्गावरचे भाडे 167 वरून 169 रुपये होणार आहे.

शहर बसेसच्या भाड्यातही वाढ
गेल्या दीड महिन्यांपूर्वी झालेल्या भाडेवाढीत शहर बसेसचा समावेश नव्हता. मात्र, 1 आॅगस्टपासून होणा-या भाडेवाढीत शहर बसेसचीही भाडेवाढ करण्यात आली आहे. यात निमाणी ते पवननगर, निमाणी ते नाशिकरोड, निमाणी ते पांडवलेणी यामार्गावरील ज्या टप्प्यांत सात रुपये भाडे आकारणी केली जात होती, तिथे आता एक रुपयांनी वाढ होऊन आठ रुपये तर उर्वरित भाड्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले.