आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाेन नाटकेच जाणार अंतिमला, पुढील अाठवड्यात येणार जीअार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत दाेन नाटके जाणार अशी घाेषणा सांस्कृतिकमंत्री विनाेद तावडे यांनी केली अाहे. अनेक केंद्रांवरील स्पर्धाही संपली पण, दाेन नाटके अंतिमला जाणार याविषयी अद्यापही जीअार निघाल्याने संभ्रम निर्माण झाला हाेता. यावर पुढल्या अाठवड्याच्या सुरुवातीलाच हा जीअार निघणार असल्याचे तावडे यांनी नाशिक भेटीत सांगितले. 


राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्राथमिक फेरीतून दाेन नाटके दाखल हाेणार ही अत्यंत अानंदाची वार्ता सांस्कृतिकमंत्र्यांनी दिली. ज्या केंद्रांवर १५ पेक्षा अधिक नाटके सादर हाेतील त्या केंद्रातील दाेन नाटके अंतिम स्पर्धेसाठी निवडावी, अशी घाेषणा त्यांनी केली हाेती. त्यामुळे राज्यभरातून जवळपास ३०-३५ नाटके अंतिम फेरीसाठी अाता दाखल हाेणार अाहेत. 


सांस्कृतिकमंत्र्यांनी घाेषणा केल्यावर मात्र अद्याप त्यासंदर्भातील शासकीय परिपत्रक अर्थात जीअार अद्याप काेणत्याच केंद्राला मिळाला नसल्याने केंद्रप्रमुखांसह रंगकर्मींमध्येही संभ्रम निर्माण झाला हाेता. पण, तावडे नाशिक येथे अाले असता, त्यांच्याशी संवाद साधल्यावर ते म्हणाले की, याबाबत संभ्रम काहीच नसावा. ज्या केंद्रांवर १५ किंवा अधिक नाटके सादर हाेतील त्या केंद्रांतून दाेन नाटके अंतिम फेरीसाठी जाणारच अाहेत. यासंदर्भातील जीअार पुढल्याच अाठवड्यात सर्वत्र पाेहाेचेल. तसेच ज्या केंद्रांवरील स्पर्धा संपलेली अाहे तेथील निकाल जाहीर व्हायला काहीच हरकत नाही, पण काही तांत्रिक बाबी असतील म्हणून निकाल जाहीर झाले नसतील. त्याचा या जीअारशी काहीही संबंध नसावा, कारण प्रत्येक केंद्रावर तीन नंबर काढलेच जातात. त्यामुळे पहिला अाणि दुसऱ्या नंबरवर येणारी नाटके अंतिमला जाणारच असल्याचे त्यांनी सांगितले.

 
शासकीय प्रक्रियेमुळे लागला थाेडा वेळ 
प्रत्येक केंद्रातील दाेन नाटके अंतिमला जाणार म्हणजे अंतिमला नेहमीपेक्षा दुप्पट नाटके सादर हाेणार, याचाच अर्थ खर्च वाढणार, त्याचसंदर्भात अर्थ विभागाची त्याला मान्यता घ्यावी लागते, ती फाइल अापण अाधीच पाठवली अाहे. साेमवारी किंवा मंगळवारी हे काम पूर्ण हाेऊन लगेच जीअार निघेल अाणि केंद्रप्रमुखांना ताे पाेहाेचेल. त्यामुळे रंगकर्मींनी निर्धास्त रहावे. अधिकाधिक रंगकर्मींना माेठे व्यासपीठ मिळावे, संधी मिळावी यासाठीच हा निर्णय घेण्यात अाला अाहे. 
-विनाेद तावडे, सांस्कृतिकमंत्री, महाराष्ट्र 

बातम्या आणखी आहेत...