आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stay At Chief Minister Home, Nationalist Congress Leader Pichad Warning

...तर मुख्यमंत्र्यांच्या घरी मुक्काम, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री पिचड यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माळीण गाव दुर्घटनेला येत्या ३० जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या दुर्दैवी घटनेत संपूर्ण गाव नष्ट होऊन १७० जणांचा मृत्यू झाला. तेथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन निर्णयही काढण्यात आला होता. मात्र, सत्ता बदलानंतरच्या फडणवीस सरकारने तेथील जनतेला कोणतीही सुविधा दिली नाही. येथील नागरिकांना घरेही बांधून दिली नाहीत. यामुळे माळीण गावातील सर्व नागरिकांचा मुक्काम मुख्यमंत्री देवंेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हलविण्यात येणार असल्याचा इशारा माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी पत्रकार परिषदेत दिला.

पुणे जिल्ह्यातील माळीण गावाच्या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून तेथील नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. या दुर्घटनेमध्ये १७० नागरिकांचा बळी गेल्याने या गावामध्ये त्यांच्या नावाने स्मृतिवन तयार करण्यात येणार असून त्यामध्ये १७० मोहाची वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान, धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करून देणार नाही. जर शासनाने आदिवासीवर अत्याचार करणारा निर्णय घेतला तर देशभर आदिवासी समाज तीव्र आंदोलने करेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच केळकर समितीने आदिवासीच्या विकासासाठी सुचविलेल्या सूचना त्वरीत अमलात आणाव्यात, अशीही मागणी पिचड यांनी केली.

तर आदिवासी आयुक्तांनी आरएसएस कॅम्पमध्ये जावे
सध्याचे आदिवासी आयुक्त यांना आदिवासी पंरपरा आणि आदिवासीच्या समस्यांबद्दल काहीच माहिती नसल्याने त्यांच्याकडून समस्या सुटणे कठीण आहे. तसेच त्यांना आदिवासी समाजातील आदर्श आणि महान व्यक्तिंबाबत माहिती नसल्याने त्यांनी आरएसएस कॅम्पमध्ये जायला हवे, असेही पिचड यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

भुजबळांना आमचा पाठिंबा
केंद्र सरकारने जनगणना केली असून जातीनिहाय आकडेवारी जाहिर करावी, अशी आमची मागणी आहे. तसेच आदिवासी समाजाची आकडेवारी त्वरित घोषित करावी, भुजबळसाहेबांनी जातीनिहाय आकडेवारीसाठी आंदोलन सुरू केले असून त्याला आमचा पाठिंबा आहे असे पिचड यांनी सांगितले.