आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभागरचनेला स्थगितीबाबत अाता १३ डिसेंबर राेजी हाेणार फैसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या प्रभागरचनेबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याबाबत जिल्हा दिवाणी न्यायालयाच्या अादेशावर १३ डिसेंबरला पुढील सुनावणी हाेणार असून, शुक्रवारी महापालिकेने जिल्हा न्यायालयाच्या अधिकार कक्षेत या प्रकरणाची सुनावणी घेण्याबाबत अाक्षेप व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.
महापालिकेची तीन महिन्यांवर निवडणूक अाली असून, ३१ प्रभागांतून १२२ जागांसाठी निवडणूक हाेणार अाहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक अायाेगाने २५ नाेव्हेंबर राेजी अंतिम प्रभागरचना जाहीर केली. प्रभागरचना जाहीर हाेण्यापूर्वी ३२ हरकतींवर सुनावणी झाली, मात्र फारसे बदल झाले नाही. दरम्यान, हर्षल जाधव यांनी जिल्हा दिवाणी न्यायालयात धाव घेत गूगल मॅपवर ठळकपणे प्रगणक गट अधाेरेखित करण्याच्या राज्य निवडणूक अायाेगाच्या अादेशाचा भंग झाल्याची तक्रार केली. राज्य निवडणूक अायाेगाच्या अादेशाचे पालन करताच महापालिकेने प्रभागरचना केल्याचाही अाराेप हाेता. हा दावा दाखल करून घेताना जिल्हा दिवाणी न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया ‘जैसे थे’ ठेवण्याचे अादेश दिले हाेेते. थाेडक्यात पुढील प्रक्रियेला स्थगिती हाेती.

दरम्यान, डिसेंबर राेजी महापालिकेला यासंदर्भातील म्हणणे मांडण्यासाठी अादेश दिले हाेते. या दाव्यात राज्य निवडणूक अायाेग, विभागीय अायुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका अायुक्तही प्रतिवादी हाेते. दरम्यान, महापालिकेला सर्वांनी मिळून बाजू मांडण्यासाठी प्रतिवादी करण्यात अाले हाेते. त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या न्यायकक्षेत संबंधित दावा येण्याबाबत अाक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. पुढील सुनावणी १३ डिसेंबरला हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...