आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्थायी समिती सभापतिपदाची आज निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या स्थायी समिती सभापतिपदासाठी सोमवारी (दि. 30) निवडणूक होत आहे. सत्ताधारी मनसे व भाजप या दोन्ही पक्षांनी या पदावर दावा केल्याने, तसेच शिवसेनाही माघार घेण्यास तयार नसल्याने सभापतिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या वर्षी महाआघाडीतील काँग्रेसचे नगरसेवक उद्धव निमसे यांना सभापतिपदाची संधी मिळाली. त्यानंतर दुस-या वर्षी झालेल्या निवडणुकीत मात्र महाआघाडीमध्येच बिनसल्याने त्याचा फायदा मनसे-भाजप युतीच्या उमेदवाराला होऊन मनसेचे रमेश धोंगडे सभापती झाले. या वेळी भाजपने या पदासाठी हट्ट धरल्याने मनसेसमोर पेच निर्माण झाला आहे. गेल्या वेळेप्रमाणे शिवसेनेने साथ न दिल्यास मनसेची कोंडी होऊ शकते. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवरच मनसेची मदार आहे. महाआघाडीचे सूत्र पूर्वीप्रमाणे जुळून आलेच तर शिवसेनेचा उमेदवार सभापती म्हणून विराजमान होऊ शकतो. मात्र, अद्याप सर्व राजकीय समीकरणे गुलदस्त्यात असल्याने, तसेच एकाही पक्षाने आपली भूमिका जाहीर न केल्याने सभापतिपदाची निवडणूक अधिकच रंजक होणार आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने विविध विकासकामांच्या मंजुरीबरोबरच भूसंपादनासारखे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याने मोठी आर्थिक उलाढाल या काळात होणार आहे. त्यामुळे स्थायी समितीचा सभापतीही तेवढ्याच तोलामोलाचा असणार, हे नक्की !