आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे चाैथ्या दिवशीही रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड- आसनगावजवळ नागपूूर-मुंबई  दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातामुळे शुक्रवारी सलग चौथ्या दिवशीही मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. अनेक प्रवासी गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या. सलग चौथ्या दिवशी गोदावरी व राज्यराणी एक्स्प्रेस रद्द केल्यामुळे  प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. गोदावरी सलग चार दिवसांपासून रेल्वे स्थानकात सायडिंग ट्रॅकवर उभी आहे.  

रांची-कुर्ला हातिया एक्स्प्रेस सकाळी १० वाजता मनमाड स्थानकात आल्यानंतर या गाडीचा पुढील प्रवास रद्द केल्याची घोषणा प्रशासनाने केली. त्यामुळे परप्रांतातून आलेल्या हजारो प्रवाशांचे हाल झाले. या प्रवाशांना अलाहाबाद-मुंबई तुलसी एक्स्प्रेसने मनमा-दौंड-पुणेमार्गे 
मुंबईला  जावे लागले. मनमाड  येथून लासलगाव, निफाड, नाशिक, देवळाली, इगतपुरी येथे जाण्यासाठी एकही गाडी नसल्याने आणि गोदावरी रद्द केल्याने चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी बारा वाजता मनमाड कुर्ला-गोदावरी एक्स्प्रेस देवळालीपर्यंत सोडण्यात आल्याने रेल्वेने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...