आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डंप औषधांचा ट्रक अखेर बाविसाव्या दिवशी हटविला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कालबाह्य औषधांचे डंपिंग सुरू असताना पकडलेला तो ट्रक अखेर बावीस दिवसांनंतर घटनास्थळावरून हटविण्यात आला आहे. हा ट्रक त्वरित हलविण्यात यावा, या मागणीकरिता गुरुवारी उद्योजकांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयात धडक दिली होती. ट्रक उद्योगभवनाच्या आवारात आणून उभा करा, अशी संतप्त मागणी त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली होती. त्यानंतर दोन दिवसांत ट्रक हलविण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीच्या वेअर हाउसजवळील मोकळ्या भूखंडावर 12 जुलैला सकाळी हा ट्रक उद्योजकांनी पकडला होता. ट्रकमधील कालबाह्य औषधांच्या उग्र दर्पामुळे परिसरातील उद्योजक आणि कामगारांना त्रास होत होता. त्यांचे आरोग्य धोक्यात आले होते, तरी प्रदूषण नियंत्रण महामंडळाला जाग नव्हती.

पाठपुराव्यामुळेच शक्य
‘दिव्य मराठी’ने या ट्रकबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध केल्यानंतरच संबंधितांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतरही पाठपुरावा कायम ठेवल्यानेच हा ट्रक लवकर हटविण्यात विभागाला भाग पडले.
-निखिल पांचाल, उद्योजक

झूममध्ये विचारणा करणार
जिल्हा उद्योग मित्रच्या (झूम)च्या बैठकीत या हलगर्जीपणाबद्दल प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. ज्यांच्या मालकीची जागा होती, त्यांच्यासह गुन्हा दाखल केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेळकाढू धोरणाबद्दल शंका आहे.
-सुरेश माळी, अध्यक्ष, आयमा