आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडितनगरला घरांवर दगडफेक; परिसरात दहशत, मद्यपी-टवाळखोरांचे कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - पंडितनगर, मोरवाडी, उत्तमनगर भागातील टवाळखोर मद्यपींच्या गुंडगिरीमुळे नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. हे गुंड केवळ शिवीगाळच करीत नाहीत तर जे नागरिक त्यांना रागावतील त्यांच्या घरांवर दगडफेक करीत आहेत. दुचाकीवर जोरात येणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, एकमेकांत हाणामाऱ्या करणे, रात्री उशिरापर्यंत जोरजोरात गप्पा मारत बसणे अशा सर्व प्रकाराने नागरिक हैराण झाले आहेत. विरोध करणाऱ्यांना धमकावले जात असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत असून यावर कारवाईची मागणी महिलावर्गाने केली आहे. 
 
पंडितनगर येथील महिला अनेक दिवसांपासून टवाळखोरांच्या दहशतीला वैतागल्या आहेत. सर्वसामान्य कामगारवर्ग या भागात राहताे. याच भागात यापूर्वी देशी दारूचे अनेक अवैध धंदे सुरू होते. यामुळे संपूर्ण परिसरच गुन्हेगारांनी त्रस्त झाला आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिक महिलावर्गाला होत आहे. अनेक दिवसांपासून हे सर्व सहन करणाऱ्या महिलांनी अाता एकत्रित अंबड पोलिसांमध्ये या सर्व प्रकारांबाबत निवेदन दिले. पोलिसांनी तातडीने योग्य ती कारवाई करून गस्त वाढविण्याचे अाश्वासन दिले. रेखा आहिरे, शर्मिला महाजन, सुनीता फुलपगारे, भारती हसे, नंदा वाघ, रूपाली जाधव, सावित्री भोर, मंगला राठोड, सुरेखा पवार यांच्यासह अनेक महिलांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या अाहेत. 
 
आम्हीच ‘भाई’ अशी धमकी दिली जाते.. 
या गुंडांची इतकी दादागिरी आहे की, त्यांना कोणी हटकल्यास आम्हीच येथील ‘भाई’ असून अाम्हाला कुणाचेही भय नाही. तुम्हीदेखील ही बाब लक्षात ठेवा, अशा धमक्या दिल्या जातात. उद्धट वर्तन केले जाते. 
- नंदा वाघ, नागरिक 
 
महिलांमध्ये अाहे प्रचंड दहशत... 
या भागात रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास महिलांना भीती वाटते. हे गुंड शिवीगाळ करतात. आमच्या घरांवर दगडफेक करतात. वाहने पेटविण्याच्या धमक्या देतात. यामुळे आमच्या जीवालाही धोका आहे. 
- रेखा आहिरे, नागरिक 
बातम्या आणखी आहेत...