आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना भाषा, ना सीमा.. मानवधर्मा...! वनेचे रंग गहिरे.. हे सगळे माझे सोयरे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्यावर्षी उत्तराखंडमधील महाप्रलयाने थैमान मांडले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने कहर केला. ‘मला कमी लेखू नका’ म्हणत काश्मीरवर तो आठवड्यापेक्षा अधिक काळ धो-धो बरसला. झेलम, चिनाब, तावी आणि अखनूर यांसह सर्व नद्यांनी अक्राळ-िवक्राळ रूप धारण केले. काही नद्यांवरील पूलही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. रेल्वे आणि विमानसेवा ठप्प झाली. घराघरांत पाणी शिरले. घरांबाहेर मोठमोठे तलाव साचले. असंख्य घरे नेस्तनाबूत झाली. त्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले.
सर्वत्र पाण्यामुळे डायरिया, मलेरिया, डेंग्यूसारखे आजार बळावले. त्याचा स्थानिक डॉक्टरांनाही तडाखा बसल्याने उपचार कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. शेकडो लोकांनी प्राण गमावले. अशा स्थितीत नाशिकची वैद्यकीय टीम पुढे आली. बघता-बघता काश्मीरमध्ये मोठे काम उभे राहिले. त्यासाठी अधिक कदम यांच्या ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेची मदत झाली.
पहिल्या टप्प्यात मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे १० डॉक्टर काश्मीरला रवाना झाले. त्यातील ितघे एम.डी.चे शिक्षण घेत आहेत, तर सात जण इंटर्नशिप करीत आहेत. मोतीवाला महाविद्यालयातील १६ आणि गणेशवाडी येथील आयुर्वेद महाविद्यालयाच्या पाच डॉक्टरांचा मोठा चमूही रवाना झाला. आतापर्यंत सुमारे पावणेदाेन लाख जणांची आरोग्य तपासणी झाली आहे.
शहरातील साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, मोतीवाला महाविद्यालयाचे डॉ. फारुक मोतीवाला, डॉ. अफसाना मोतीवाला, मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांच्यासह डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. लक्ष्मीकांत पाठक, डॉ. लियाकत नमोले यांनीही यासाठी मोलाची मदत केली.

जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमचे नितीन जांगडा, पारस लोहाडे, कमलेश कोठारी यांनी पाच लाख रुपये किमतीचे ३६०० ब्लँकेट पूरग्रस्तांना दिले. वैद्यकीय सेवा देताना डॉ. सुमेध कुदळे, डॉ. वैभव जोशी, डॉ. वैभव सावळे, डॉ. मिथिलेश अहिरे, डॉ. रवी गुप्ता, डॉ. विक्रम सैनी, डॉ. अमित गांजावाला, डॉ. संजय पांडे, डॉ. विनायक चव्हाण या डॉक्टरांनी जिवाचे रान केले.
एकीकडे डॉक्टरांकडून मदतीचा ओघ येत असताना सामाजिक जाणिवांचे भान असलेल्या मंडळींनीही डॉक्टरांच्या चमूला मोठी मदत केली. शहरातून पाच रुग्णवाहिका नेल्या होत्या. महापौर अशोक मुर्तडक यांनी त्यांच्याकडील रुग्णवाहिका विनामूल्य वापरायला दिल्या. जिज्ञासा कला, शिक्षण संस्था, पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया यांचीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली. मात्र, रुग्णवाहिका चालवायची कोणी, असा प्रश्न उभा ठाकला. अशा वेळी हृषीकेश परमार, सचिन शिनगारे आणि जॉश श्रीवास्तव यांनी चालकाची भूमिका वठवली. तिघांनीही पहिल्यांदाच रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हातात धरले होते. काश्मीरपर्यंत जाताना त्यांनी पंजाबलाच एक हॉल्ट घेतला. नॉनस्टॉप चालवत त्यांनी रुग्णांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यात यश मिळविले.
सप्टेंबरची रात्र...काश्मीरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात... खरे तर, सुरुवातीला सर्वसामान्य वाटणाऱ्या या पावसाने काही तासांत राैद्र रूप धारण केले आणि नंतर तो सतत आठवडाभर त्याच गतीने कोसळत राहिला. त्यामुळे नद्यांना प्रलयंकारी पूर आला. परिणामत: काश्मीरमधील घरे, वस्त्या, रस्ते आणि सारे काही पुरात बुडून गेले. आपत्कालीन स्थितीत मदत करणाऱ्या संस्थांचेही होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे आता कुणीच वाली नाही, अशी भावना होत असतानाच नाशिकमधील एक मोठी वैद्यकीय टीम तेथे दाखल होते आणि दिसेल त्यावर वैद्यकीय उपचार करायला सुरुवात करते. बघता-बघता तब्बल पावणेदाेन लाखापेक्षा अधिक लोकांवर उपचार होतात. काश्मीरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या नाशिककरांची ही आँखाे देखी...
काश्मीरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले नाशिककर; डॉक्टर, रुग्णवाहिकाचालक यांचा जिवंत अनुभव
पुढील स्‍लाइडवर वाचा, नाशिककर; डॉक्टर, रुग्णवाहिकाचालक यांचा जिवंत अनुभव