आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा माहात्म्य: साधूंच्या श्रेणी अन‌् अाखाड्यांची अंतर्गत व्यवस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभमेळ्यात दाखल हाेणाऱ्या साधूंमध्ये काही विगतवारी असते का? श्रेणी कशी असते? त्यांची रचना कशी असते? त्यांचे कामकाज कसे चालते? त्यांची अंतर्गत व्यवस्था कशी असते? त्यांच्या संपत्तीची निगराणी कशी राखली जाते? यासारख्या बाबींची सगळ्यांनाच उत्सुकता असते. मात्र, त्या बाबी बहुतांश काळ अंधारातच राहतात. केवळ सिंहस्थ काळापुरताच सामान्यांचा या साधूंशी संबंध येत असल्याने नागरिक या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. मात्र, ही रचना अाणि व्यवस्थादेखील माेठी रंजक अाहे.
यात्री ते नागा अतीत
अाखाड्यातील व्यवस्थेमध्ये प्रत्येक साधूची एक श्रेणी असते. त्यात सगळ्यात नवख्या साधूला यात्री असेच संबाेधले जाते. त्याने अापल्या अाखाड्यातील साधूंसाठी दातून अाणि पूजेसाठी फुलांची व्यवस्था करणे अपेक्षित असते. छाेरा श्रेणीतील साधूंनी सगळ्यांच्या स्नानाची अाणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची असते. बन्दगीदार या श्रेणीतील साधूंनी झाडूने मठाचा परिसर स्वच्छ राखणे, साफसफाई करणे, स्वयंपाक तयार करणे अाणि शस्त्रविद्या ग्रहण करणे हे त्यांचे काम असते. मुरीठीया श्रेणीतील साधूंनी भगवंंताच्या पूजेची तयारी करणे, अाराधना करणे अाणि शस्त्रविद्येत पूर्ण पारंगत हाेणे ही त्यांची कर्तव्ये मानली जातात. तर, नागा साधूंनी सेवकांना सूचना करणे, भगवान अाणि मठातील अनुयायांचे संरक्षण करणे, कुंभमेळ्याचे अायाेजन करणे अाणि अन्य साधूंना नागा बनवणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य असते. नागा अतीत सर्वार्थाने सिध्द नागांना नागा अतीत मानले जाते. त्यात काही अाखाड्यांमध्ये श्रेणीच्या नामावलीत थाेडासा फरक असला तरी सामान्यपणे अशीच सर्वत्र रचना असते.
पुढे वाचा...