आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छकुला तुझी वाट पाही, आई ये ना आई.; चिमुकल्यांची आर्त हाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- या जाळीआडून पाहणार्‍या या चिमुकल्यांचं जगणं किती मोठय़ा जाळ्यात अडकलं आहे याची खरं तर त्यांना कल्पनाही नाही. त्यांना आई म्हणता येतं पण आई म्हणजे काय? ती कशी असते हे त्यांना माहितीच नाही. मात्र, आम्हाला आई-बाबा हवेत अशी आर्त हाक ते मारत आहेत. त्यांच्यावर सध्या माता-पित्याची सावली धरली आहे ती आधाराश्रमाने. आधाराश्रमात असलेले तुषार, दीदी आणि मोनिका व दीदी हे त्यापैकीच. यांना खाडखाड बोलता येत नसलं तरीही त्यांचे बोलके डोळे ‘आम्हाला आई बाबा हवेत’, हेच सांगत आहेत.

5 जुलै 2013.. एका निर्दयी मातेनं आपल्या पोटच्या गोळ्यांना रामकुंड परिसरात बेवारसपणे सोडून पलायन केलं. भीक मागणार्‍या एका महिलेने या दोघी बहिणींना आपल्याजवळचं खायला देऊन माणुसकी जपली. त्यानंतर पंचवटी पोलिसांच्या माध्यमातून या दोघीही आधाराश्रमात दाखल झाल्या. त्यातली मोनिका अडीच वर्षाची, तर तिची बहीण दीदीचं वय दीड वर्षं. या दोघींच्या आईचा शोध आधाराश्रमासह पोलिस घेत आहेत. दरम्यानच्या काळात या बहिणींना ओळखणारी एक महिला आधाराश्रमात आली होती. तिने या मुली पेठ तालुक्यातल्या असल्याचं सांगितलं. त्यानंतर आधाराश्रमाने पेठ पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. परंतु अद्याप शोध लागलेला नाही.