आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वी घृणा करणाऱ्यांना आज वाटतो अभिमान, जनजागरणासाठी देशभर भ्रमंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकचे सुरेश धोंडगे गेल्या १६ वर्षांपासून कुष्ठरोगासारख्या गंभीर आजारावर जनजागरण करत आहेत. यासाठी देशभर त्यांची भ्रमंती सुरू आहे. या आजाराविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांनी याची सुरुवात स्वत:च्या भालेगावपासून केली. गावाला त्यांनी कुष्ठरोगमुक्त केले. त्यांनी स्वत: या आजाराशी १० वर्षे लढा दिला. त्यानंतर यासंबंधीच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा निश्चय केला. त्यांनी कुष्ठरोग झालेल्या मंगलशी विवाह केला. तिला वडिलांनी घरातून हाकलून दिले होते. मंगलनेही स्वबळावर स्वत:चे आयुष्य सावरले. आज हे दांपत्य इतरांसाठी काम करत आहे.
सुरेश सांगतात, ‘मला कुष्ठरोगाने १६ व्या वर्षी विळखा घातला. त्यापायी शाळाही सोडावी लागली. माझा आजार इतरांना कळू नये याची काळजी घेतली गेली. डॉक्टरांकडे नेण्याएेवजी पालक धार्मिक स्थळी घेऊन गेले. पूजा-अर्चेने यावर उपाय शोधले गेले. अनेक वर्षे काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांकडे नेले. डॉक्टर म्हणाले, स्पेशालिस्ट उपचार मिळाले नाहीत तर माझा जीवही जाऊ शकतो. शेवटी पुण्याच्या कोंढवा कुष्ठरोग रुग्णालयात दाखल केले. तेथे वर्षे उपचारानंतर मी रोगमुक्त झालो. मात्र, उपचारात दिरंगाई झाल्याने डावा हात आणि दोन्ही पाय मुरगळले गेले. प्रकृती सुधारल्यानंतर ऑफिस बॉयची नोकरी केली. सोबतच शिक्षणही पूर्ण केले.
सर्वात प्रथम मी माझ्या गावाला कुष्ठरोगाशी संबंधित अंधश्रद्धांपासून मुक्त केले. मी स्वत:चे अनुभव लोकांना सांगतो. त्यामुळे त्यांनी त्यापासून धडा घ्यावा. अंधश्रद्धेपासून गावाला मुक्त केल्याच्या प्रयत्नांसाठी २०१३ मध्ये भारत सरकारने कुष्ठरोग मुक्ती श्रेणीतील ‘आदर्श व्यक्ती’ पुरस्काराने गौरवले. आज अनेक लोक मला यासाठी संपर्क करतात. त्यांना माझा अभिमान वाटतो,’ असेही सांगतात.