आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1 नोव्हेंबरपासून ‘स्टँडर्ड वजनी पॅक’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - 1 नोव्हेंबरपासून सॉफ्ट ड्रिंक आणि मिनरल वॉटरची विक्री स्टॅँडर्ड वजनी पॅकमध्येच करावी लागणार आहे. केंद्र सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने नुकताच निर्णय घेतला आहे.

स्टॅँडर्ड वजनाच्या यादीत दोन्ही वस्तूंचा समावेश केला असून, याबाबतची माहिती राजपत्रातही प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारने विधिक मापविज्ञान अधिनियम 2009 मध्ये बदल केला आहे. आता याला विधिक मापविज्ञान (पॅकिंगमध्ये ठेवल्या जाणार्‍या वस्तू) संशोधन अधिनियम 2012 या नावाने ओळखले जाईल. या बदलामुळे 31 ऑक्टोबरपर्यंतच स्टॅँडर्ड वजन नसलेल्या वस्तू बाजारात विकता येतील. केंद्र सरकारने बाजारात सध्या उपलब्ध असलेले असे उत्पादन पूर्णपणे विक्री करण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिला आहे. यापूर्वी सरकारने जून 2012 पर्यंतची अंतिम मुदत दिली होती.
या वस्तूंचा होता समावेश - बालकांसाठीचा आहार, बिस्किट, ब्रेड, ब्राऊन ब्रेड, दही आणि मार्गारीन, धान्य आणि डाळी, चहापत्ती, खाद्य तेल, वनस्पती तूप, बटर ऑइल, दूध पावडर, साबण, डिटर्जंट पावडर, तांदूळ चुरा, पीठ, रवा, मीठ आणि सौंदर्य साबण या वस्तूंचा आतापर्यंतच्या यादीत समावेश आहे.
स्टॅँडर्ड वजन असे - केवळ फळावर आधारित सॉफ्ट ड्रिंक्स 65 मिलीलिटर वजनाच्या पॅकमध्ये विक्री करता येतील. याशिवाय इतर सॉफ्ट ड्रिंक्स 100, 125, 150 ते 330 मिलीलिटर (केवळ कॅनमध्ये), तर 350 ते पाच लिटरपर्यंत (अन्य पॅकमध्ये) विक्री होऊ शकतील. याचप्रमाणे मिनरल वॉटर 100, 150, 200, 250 मिलीलिटर ते पाच लिटर यांसारख्या स्टॅँडर्ड वजनी पॅकमध्येच विक्री करता येतील.