आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहाे अाश्चर्यम्, शहरात तीनच अनधिकृत हाेर्डिंग्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उच्च न्यायालयाच्या अादेशानुसार २६ जानेवारीपर्यंत शहर हाेर्डिंगमुक्त करण्याचा विडा उचलणाऱ्या महापालिकेला पहिल्याच दिवशी सहाही विभागांतून जेमतेम तीनच अनधिकृत हाेर्डिंग्ज गवसल्याची अाश्चर्यकारक बाब समाेर अाली आहे. संख्या माेठी दिसण्याच्या दृष्टीने उपयुक्त असे ६७ बॅनरही जप्त करण्यात अाले आहेत.

अनधिकृत हाेर्डिंग्जमुळे शहर बकाल हाेत असून, असे हाेर्डिंग्ज लावणाऱ्यांविराेधात कठाेर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या हाेत्या. त्यात प्रथम अनधिकृत हाेर्डिंग्ज लावणाऱ्यांविराेधात फाैजदारी कारवाई करण्याचा निर्णय झाला हाेता. काही काळ कारवाई केल्यानंतर पुढे प्रशासनालाही विसर पडला. दरम्यान, उच्च न्यायालयाने २६ जानेवारीचा अल्टिमेटम दिल्यावर पुन्हा महापालिकेची यंत्रणा कारवाईसाठी सज्ज झाली. दाेन दिवसांपूर्वी अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांनी विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने अनधिकृत हाेर्डिंग्ज काढून घेण्याचे अादेश दिले हाेते. या माेहिमेला बुधवारी प्रारंभ झाल्यानंतर सायंकाळपर्यंत केवळ तीनच अनधिकृत हाेर्डिंग्ज शहरातून काढण्यात अाले.
दरम्यान, सिडकाे नाशिकराेडमध्ये गाड्या बंद पडल्यामुळे हाेर्डिंग्जविराेधात माेहीमच झाली नसल्याचेही सांगितले जाते.

कठाेर कारवाई करू
अनधिकृत हाेर्डिंग्ज नजरेतून सुटले असतील, तर उद्यापासून कठाेर कारवाई केली जाईल. नागरिकांनी पालिकेकडे ‘टाेल फ्री’ क्रमांकावर संपर्क साधावा. राेहिदास बहिरम, उपायुक्त,महापालिका

येथे अाढळले हाेर्डिंग्ज
>नाशिकपूर्व-2
>पंचवटी - 1
येथे अाढळले बॅनर
>नाशिक पश्चिम -३५
>सातपूर- २०
>पंचवटी - १२