आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरी हिंसाचारावर रणनीती तयार : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- काश्मीरमध्ये लष्करावर होत असलेल्या दगडफेकीवर विशेष रणनीती तयार करण्यात आली आहे.  लवकरच त्याचे परिणाम सर्वांना दिसतील, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवारी व्यक्त केला.  
 
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी  ते बोलत होते. डॉ. भामरे म्हणाले, पाकिस्तानची सरळ आपल्या सैन्याशी लढण्याची हिंमत नाही म्हणून लपून-छपून हल्ले केले जात आहेत. काश्मीरमधील सैन्यावर केली जाणारी दगडफेक, त्यातून होणारा हिंसाचार हा त्याचाच एक भाग आहे.  पाकिस्तानला जमिनीवर युद्धात आपण केव्हाही पराभूत करू शकतो.  याची कल्पना त्यांना आहे. काश्मीरचा मुद्दाही तासाभरातच आपण निकाली काढू शकतो. पण त्यात भारतीय नागरिकांच्या जिवालाही धोका आहे. त्यामुळे सैन्याकडून संयम ठेवला जातो. त्याचाच गैरफायदा पाकिस्तान घेत असल्याचे स्पष्ट करत डॉ. भामरे यांनी आता चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगितले. कारण त्यावर पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालयाने स्वतंत्र रणनीती तयार केली आहे. त्याचे परिणामही आता दिसून येतील, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...