आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायमास्ट नाशिकमध्ये, तर बटण नाशिकरोड हद्दीत ; दुरुस्तीनंतरही हायमास्ट बंदच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उपनगरयेथे सहा दिवे असलेला सहा महिन्यांपासून बंद असलेला हायमास्ट मंगळवारी (दि. १८) नाशिकरोड येथील कर्मचाऱ्यांनी दुरुस्त केला. त्याबद्दल उपनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालक संघटनेने कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन अभिनव पद्धतीने अभिनंदनही केले. सायंकाळी हायमास्ट सुरू होईल यामुळे रहिवासी आनंदात होते. मात्र, हायमास्ट सुरू झालाच नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

या हायमास्टबाबत नाशिकरोड येथील विद्युत विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता तो हायमास्ट नाशिकच्या हद्दीत येतो, असे उत्तर दिले जाते, तर नाशिक भागातील कर्मचारी त्या हायमास्टचे बटण नाशिकरोड हद्दीत असल्याचे सांगतात. त्यामुळे मंगळवारी (दि. १८) हा हायमास्ट दुरुस्त केल्यानंतरही तो सुरू होऊ शकला नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. या वादात वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. हायमास्टची दुरुस्ती ज्या कर्मचाऱ्यांकडे आहे, ते हद्दीचे कारण सांगून कामाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. स्वच्छतेच्या बाबतीतही तसे होताना आढळते. दरम्यान, या वेळी नाशिक पूर्व प्रभागाचे सभापती प्रा. कुणाल वाघ यांनी कर्मचाऱ्यांना चार शब्द सुनावत नागरिकांना सुविधा देण्यासाठी सांगितले. संजय लोखंडे, गजानन मांडे, बाळू सूर्यवंशी यांनी हायमास्ट सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
तक्रार नेमकी करावी कोणाकडे?
उपनगरनाका हा प्रभाग ५५ आणि प्रभाग ३७ यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे येथील स्वच्छता, घंटागाडी, पथदीप यांच्या तक्रारी नेमक्या कोणाकडे करायच्या याबाबत येथील नागरिकांमध्ये संभ्रम असतो. कर्मचारी नेमका याचाच फायदा उचलत कामाकडे दुर्लक्ष करतात.