आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरातील बंद पथदीपांचा सभापतीच घेणार आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंचवटी प्रभागात गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या पथदीपांचा सभापती आढावा घेणार आहेत. ‘एलईडी’च्या नावे अधिकाऱ्यांकडून नागरिकांसह लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली जात असल्याने विद्युत विभागाच्या गुदामावर अचानक छापा टाकण्यात येऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार आहे.
पंचवटी प्रभागात सुमारे १५ हजार पथदीप आहेत. त्यातील निम्मे बंद आहेत. परिसरात अंधारामुळे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून, अधिकारी तीन वर्षांपासून ‘एलईडी’ बसविण्यात येणार असल्याचे सांगत वेळ मारून नेत आहेत. परिणामी लोकप्रतिनिधींसह नागरिकांची दिशाभूल होत असल्याने सभापती सुनीता शिंदे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. या वेळीदेखील अधिकाऱ्यांनी साहित्य उपलब्ध होत नसल्याचे सांगितले.

यापुढे अधिकाऱ्यांना विचारता अचानक विद्युत विभागाच्या गुदामावर छापा मारण्यात येणार असल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले. त्यात दोषी अाढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेतही सभापती सुनीता शिंदे यांनी दिले आहेत.

..तर अधिकाऱ्यांवर कारवाई
साहित्य असूनही अधिकारी पथदीप दुरुस्त करत नाहीत. गुदामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सुनीताशिंदे, सभापती, पंचवटी प्रभाग

येथील पथदीप आहेत बंद

म्हसरूळ,जुईनगर, बोरगड, पेठरोड, आरटीओ कॉर्नर, आडगाव मळे परिसर, त्रिकोणी बंगला, शरयू पार्क, रासबिहारी शाळा परिसर, शिंदेनगर, प्रोफेसर कॉलनी, दिंडोरीरोड, मेरी लिंकरोड, वडजेनगर या भागातील पथदीप अनेक दिवसांपासून बंदच असल्याचे निदर्शनास येत आहे.