आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवटी प्रभागातील हजार पथदीप बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महानगरपालिकेतील भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक मोठा प्रभाग असलेल्या पंचवटी प्रभागातील १९ हजार पथदीपांच्या देखभाल - दुरस्तीची धुरा अवघ्या आठ वायरमनच्या खांद्यावर असल्याची बाब समाेर अाली अाहे. एकूण पथदीपांपैकी सुमारे तीन हजार पथदीप अडीच वर्षांपासून बंद आहेत. तर पंधराशे पथदीप दिव्याअभावी गंजत पडले असल्याचे दिसून अाले आहे. विद्युत विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना पावसाळ्यात अंधारात जीव धोक्यात घालत मार्ग शोधावा लागत असून, अपघातांच्या घटनादेखील वाढू लागल्या अाहेत.
पंचवटी प्रभाग भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक मोठा आहे. मळे परिसर आणि नवीन वसाहतींसह झोपडपट्टी आणि गावठाण अशा संमिश्र नागरी परिसरात असलेल्या पंचवटी भागात १९ हजार पथदीप आहेत. या पथदीपांची देखभाल-दुरस्ती करण्यासाठी विद्युत विभागाकडे अवघे वायरमन एक इलेक्ट्रिशियन कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे पंचवटी परिसरातील हिरावाडी, त्रिकोणी बंगला, धात्रक फाटा, आडगाव मळे परिसर, महामार्ग परिसर, कोणार्कनगर, नांदूरगाव, औरंगाबादरोड, मखमलाबाद, बोरगड, म्हसरुळ मळे परिसरातील सुमारे हजार पथदीप बंद अवस्थेमध्ये आहे.

तर कोणार्कनगर, हनुमाननगर, नांदूर, आडगाव मळे परिसरातील पंधराशे पथदीपांवर दिवे लागलेले नाही. अडीच वर्षांपासून दिव्यांच्या प्रतीक्षेत असलेले हे पथदीप गंजून जीर्ण झाले आहेत. संतप्त नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि सभापती रुची कुंभारकर यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. एेन पावसाळ्यात मळे परिसर आणि नवीन वसाहतीमधील नागरिकांना चिखल तुडवत अंधारात वाट शोधावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

या भागातील पथदीप बंद
प्रभाग १९ मधील हिरावाडी, त्रिकोणी बंगला धात्रक फाटा, आडगाव मळे परिसर, महामार्ग परिसर, कोणार्कनगर, नांदूरगाव, औरंगाबादरोड, मेरी, तलाठी कॉलनी, म्हसरुळ, मखमलाबाद, बोरगड अादी भागांतील पथदीप माेठ्या प्रमाणावर बंद असल्याचे दिसून अाले अाहे. विशेष म्हणजे, अनेक पथदीपांची प्रचंड दुरवस्था झाली अाहे.

विद्युत विभागामुळे नाराजी
^पंचवटी परिसरातील बंद पथदीपांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. विद्युत विभागाने या गंभीर समस्येची तत्काळ दखल घ्यायला हवी. बंद पथदीप तातडीने दुरुस्त करावे. गंजलेले पथदीप धोकेदायक बनले असून, ते तत्काळ काढून त्याठिकाणी नवीन पथदीप लावावेत. -रुची कुंभारकर, सभापती, पंचवटी प्रभाग
बातम्या आणखी आहेत...