आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांविनाच तीन हजार विजेचे खांब, निद्रितावस्थेतील पालिका प्रशासनाला नाही साेयरसुतक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील पथदीपांचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून खदखदत अाहे. खांब आहेत, पण दिवे नाहीत आणि दिवे आहेत तर लागत नाहीत, अशी स्थिती शहरात सर्वत्र असल्याने अाता नगरसेवकांनाच नागरिकांच्या राेषाला सामाेरे जावे लागत अाहे. यापूर्वी महापालिकेने शहरात सुमारे ६४ हजार एलईडी फिटिंग्ज लावण्याचा ठेका दिला होता; परंतु त्याच्या दर्जावरच प्रश्न उपस्थित केला गेल्याने प्रशासनाने काम थांबविले होते. त्यानंतर प्रकरण न्यायालयासह शासनदरबारी पाेहोचले. तेथे स्थगिती मिळाल्यानंतर काही दिवसांनंतर हा ठेकाच रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. दरम्यानच्या काळात काही एलईडी दिवे शहरात लावून झाले हाेते.
एलईडी प्रकरण थंडावले असतानाच शहरातील ठिकठिकाणी पथदीप बंद पडल्याने नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी कमालीचा संताप आहे. शहरात अनेक भागांमध्ये विशेषत: नववसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पथदीप बंद आहेत. काही भागात खांबावरील दिव्यांचा प्रकाश मंद पडतो, तर काही भागात अंधाराचे साम्राज्य असते. महापालिकेच्या उद्यानांमध्येही उभारण्यात आलेल्या हायमास्टवरील दिवे बंद स्थितीत आहेत.
दाेन वर्षांपूर्वी महापालिकेने शहरभरात सुमारे तीन हजार विजेचे खांब उभे केले. नववसाहतींच्या रस्त्यांजवळ हे खांब उभारण्यात अाले हाेते. परंतु, अाजवर या खांबांवर दिवे लावण्यात अालेले नाहीत. दाेन वर्षांत चार वेळा फेरनिविदा काढण्यात अाल्या अाहेत. परंतु, तांत्रिक अडचणी उद‌भवून हे काम मार्गी लागलेले नाही. शहरात दिव्यांविना केवळ विजेचे खांब उभे असल्याने भुरट्या चाेऱ्यांचे प्रमाणही माेठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत अाहे.
एस. पी. बनकर, कार्यकारीअभियंता, विद्युत विभाग
एलईडीच्या निर्णयामुळे बंद पथदीपांचा प्रश्न अधिक रखडणार...
विजेच्याआणि वीजबिलाच्या खर्चात बचत व्हावी, यासाठी अाता राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांच्या रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्याबाबत निर्देश देण्यात अाले अाहेत. या दिव्यांमुळे विजेचा वापर आणि वीजबिलाच्या खर्चात ५० टक्के बचत होते. मुंबईच्या रस्त्यावरील दिव्यांच्या विजेचे बिल १६३ कोटी रुपये येते, तर या ठिकाणी एलईडी दिवे बसविल्यास त्याचे बिल फक्त ९३ कोटी रुपये एवढे येणार आहे. म्हणजे ७० कोटी रुपयांची बचत एकट्या मुंबई शहरातच होणार आहे. म्हणून राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रातही एलईडी दिवे बसवावेत, असे निर्देश शासनाकडून अाता देण्यात अाले अाहेत. त्यामुळे ही प्रक्रिया राबवायची झाल्यास रिकाम्या खांबावर दिवे येतील की नाही, असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे.

काही खांब गंजले
दाेन वर्षांपासून काेणत्याही देखभाल दुरुस्तीविना विजेचे खांब उभे असल्याने काही ठिकाणी ते गंजलेदेखील अाहेत. हे खांब येत्या काही महिन्यांत काेसळण्याचीही चिन्हे अाहेत. मात्र, सुस्त प्रशासनाला अद्यापही या परिस्थितीची गांभीर्यता नसल्याने प्रश्न िकत्येक वर्षांपासून ‘जैसे थे’च अाहे.

फेरनिविदांची केवळ अाैपचारिकता...
^विद्युतफिटिंग संदर्भातचार वेळा फेरनिविदा मागवूनही हा प्रश्न निकाली लागलेला नाही. महापालिकेच्या दिव्याखालचा अंधार घालवावा कसा, हा प्रश्न अाता नागरिकांना पडला अाहे. -उद्धव निमसे, नगरसेवक
थेट प्रश्न
अनेकविजेच्या खांबांना लागलाय गंज; कत्येक खांब काेसळण्याच्या स्थितीत
कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात विविधि विकासकामे माेठ्या प्रमाणावर मंजूर करण्यात अाली खरी. मात्र, मुख्य पर्वण्या संपल्यानंतर या कामांकडे महापालिका प्रशासनाने सपशेलपणे दुर्लक्षच केल्याचे दिसत अाहे. दाेन वर्षांपूर्वी शहरातील रस्त्यांवर तब्बल तीन हजार विजेचे खांब उभे करण्यात अाले अाहेत. परंतु, या खांबांना दिवेच नसल्याने संबंधित परिसरात दरराेजच अंधाराचे साम्राज्य पसरून त्याचा फायदा चाेरटे उचलत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत अाढळून अाले . शहरातील बंद पथदीपांचा प्रश्न अा वासून उभा असतानाच अाता शासनाने परिपत्रक काढून महापालिका क्षेत्राच्या रस्त्यांवर एलईडी लावण्याचे निर्देश दिले अाहेत. त्यामुळे अाता रिकाम्या खांबांना अजून काही महिने दिव्यांची वाट बघत बसावी लागणार अाहे. या िवनाकारण हाेणाऱ्या खर्चावर ‘डी. बी. स्टार’चा प्रकाशझाेत...
खर्चाचा लेखाजाेखा
सातपूर येथील प्रभाग क्रमांक २० मधील मिरवणूक मार्गावर एलईडी फिटिंग बसविण्यासाठी पथदीपांची व्यवस्था करणे- १५,१६,०८८ रुपये
- सिडकाेतील प्रभाग क्रमांक ४५ मधील जुन्या फिटिंग बदलून एलईडी फिटिंग लावणे- १९,९५,२१० रुपये
- सिडकाेतील प्रभाग ४५ मधील उत्तमनगर परिसरात एलईडी फिटिंग लावणे- ९,९७,६०५ रुपये
निद्रितावस्थेतील पालिका प्रशासनाला नाही साेयरसुतक, सिंहस्थाच्या मुख्य पर्वण्यांनंतर कामांकडे दुर्लक्षच
{ गेल्या दीड वर्षापासून िवजेच्या खांबांना दिवे का लावले नाहीत?
-एलईडी दिव्यांसंदर्भातील दावा न्यायप्रविष्ट असल्याने नवीन दिवे लावण्यास अडचणी येत अाहेत.
{न्यायालयाचानिर्णय लागल्याशिवाय दिवे लागणार नाहीत का?
फिटिंगसंदर्भात निविदा काढल्या अाहेत. याेग्य दर मिळाल्यास तातडीने काम करण्यात येईल.
{पथदीपांसंदर्भात नागरिकांनी काही तक्रारी दिल्या अाहेत का?

-शहरातील सहाही विभागांत पथदीपांची गरज अाहे. यासंदर्भातील अहवाल तयार अाहे. लवकरात लवकर दिवे लावण्यात येतील.

{एलईडी संदर्भात शासनाचे काही निर्देश अाहेत का?
-वीज बचतीसाठी यापुढील काळात एलईडी दिवे लावण्याचे निर्देश शासनाने दिले अाहेत.