आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगदा बंदचा ताण राणेनगरवर,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या१५ दिवसांपासून इंदिरानगर बोगदा प्रशासनाने बंद केल्याने तेथील वाहतुकीचा ताण राणेनगर बोगद्यावर पडत अाहे. इंदिरानगर, गोविंदनगर येथील वाहतूक कोंडी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इंदिरानगर बाेगदा बंद करण्यात अाल्याचे पाेलिस सांगत असले तरी प्रत्यक्षात त्याचा उलटच परिणाम हाेत असून, राणेनगर येथे वाहतूक कोंडी अपघात वाढले अाहेत. या ठिकाणी वाहतूक जीवघेणी ठरत असून, सकाळी अाणि सायंकाळच्या सुमारास इंदिरानगर, गोविंदनगर, राणेनगरपासून थेट पाथर्डी फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागत अाहेत. आता तरी प्रशासनाला जाग येऊन इंदिरानगर बोगदा सुरू होईल की, एखाद्या िनष्पापाचा बळी जाण्याची वाट प्रशासन बघत अाहे, असा संतापजनक सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
या ठिकाणी सर्व्हे करून इतर पर्यायांचा विचार प्रशासन करीत असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या वेळकाढूपणात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे वाहतुकीचा ताण कमी करीत असल्याचे सांगत असताना, दुसरीकडे वाहतुकीबाबत प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसते आहे. रस्ता प्राधिकरण, पोलिस तज्ज्ञांनी इंदिरानगर बोगदा बंद करावा, अशी शिफारस केल्याचे सांगण्यात येते. मग इतर ठिकाणच्या वाहतुकीचा अभ्यास केला का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या ठिकाणी केवळ पोलिसांचा त्रास वाचवा म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, राणेनगर भागात सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलिसांची त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बंद बोगदा सुरू करून राणेनगर इंदिरानगर या दोन्ही बोगद्यांजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारावी, तसेच कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यावरच हा प्रश्न सुटू शकेल. राहुलसोनवणे, अध्यक्ष, सुवर्णयुग मित्रमंडळ

इंदिरानगर बोगद्याकडून येणारे वाहनचालक आता राणेनगर बोगद्यातून येतात. त्यामुळे येथे वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे. शालेय विद्यार्थी, एमआयडीसीतील कामगारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे इंदिरानगर बोगदा तत्काळ सुरू करावा. मकरंदसोमवंशी, विभाग अध्यक्ष, राष्ट्रवादी

इंदिरानगर येथील बोगदा बंद केल्याने त्याचा ताण या मार्गावरील इतर ठिकाणच्या वाहतुकीवर पडत असून, राणेनगर, पाथर्डी फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. राणेनगर बोगदा येथेदेखील त्यामुळे अशी प्रचंड कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

इंदिरानगर येथील बोगदा बंद केल्याने राणेनगर बोगदा येथे वाहतुकीचा ताण वाढला असून, बससारख्या मोठ्या वाहनांची वर्दळही वाढल्याने या भागात वाहतूक कोंडी होणे ही आता नित्याची बाब झाली आहे.

पाेलिस अायुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
इंदिरानगरचा बाेगदा वाहतुकीसाठी बंद करण्यास मंगळवारी १५ दिवसांचा कालावधी पूर्ण हाेत असल्याने यावर अाता पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन नेमका काय निर्णय घेणार, याकडे लाेकप्रतिनिधींसह रहिवाशांचे लक्ष लागले अााहे. पाेलिस उपायुक्तांच्या अधिसूचनेनुसार १३ जुलैपासून हा बाेगदा वाहतुकीसाठी बंद करीत लेखानगरकडून वळसा मारून वाहनधारकांना जावे लागत अाहे. त्यामुळे अडीच किलाेमीटरचा फेरा मारावा लागत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले अाहेत. या निषेधार्थ खुद्द अामदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापाैर अशाेक मुर्तडक, नगरसेविका दीपाली कुलकर्णी, नगरसेवक यशवंत निकुळे, सतीश साेनवणे, अर्चना जाधव, कल्पना पांडे, अश्विनी बाेरस्ते, शिवसेनेचे संजय गायकर अादींनी अायुक्तांची भेट घेत बाेगदा खुला करण्याची सूचना केली अाहे. किमान इंदिरानगरकडून तिडके काॅलनी, सिटी सेंटर माॅलकडे जाणारा एकेरी मार्ग त्वरित सुरू करावा, अशी मागणी केली अाहे. शेकडाे वाहनधारकांनी हरकती अर्जदेखील भरून दिले अाहेत. लाेकभावनेनुसार अायुक्त निर्णय घेतात की अट्टहास कायम ठेवतात, याकडे लक्ष लागले अाहे.